23.1 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeधाराशिवकवठा येथील दयानंद विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात

कवठा येथील दयानंद विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात

कवठा : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील कवठा येथील दयानंद विद्यालयात डॉ. राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षकदिन गुरूवार दि. ५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे हे होते तर प्रुमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष भरतराव सोनवणे, सचिव मधुकर सोनवणे, कोषाध्यक्ष मलंग रामाशेट्टी, मुख्याध्यापक पिंताबर कांबळे व दयानंद विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वच गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे यांनी राधाकृष्णन यांच्याप्रमाणे अभ्यास करावा असा संदेश दिला. अध्यक्षीय समारोपात विजयकुमार सोनवणे यांनी आईवडील आपले पहिले गुरू असतात त्यांचे प्रथम दर्शन घ्यावे तसेच गुरूजनांबद्दल आदर बाळगावा असे मार्गदर्शन केले. आभार विद्यार्थी समर्थ भोसले याने मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR