लखनौ : नायलॉन मांजामुळे होणा-या मृत्यूंवर मुख्यमंत्री योगी अधिका-यांवर संतापले. त्यांनी अधिका-यांना विचारले की, बंदीनंतरही बाजारात मांजा कसा विकला जात आहे. यावर तात्काळ बंदी घालावी.
त्यांनी कठोर शब्दात सांगितले की, आता नायलॉन मांजामुळे होणा-या मृत्यूला हत्या मानले जाईल. पोलिस प्रमुखांना जिल्हावार छापे टाकण्याचे निर्देश दिले. खरं तर, बंदीनंतरही यूपीमध्ये नायलॉन मांजा सर्रास विकला जात आहे. राज्यात गेल्या एका वर्षात ८ लोकांचा जीव गेला आहे. लखनौमध्ये एका एमआरचा गळा कापला गेला होता. त्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. योगी म्हणाले की आता जर नायलॉन मांजामुळे कोणाचा जीव गेला, तर खुनाचा गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी संपूर्ण राज्यात यूपी पोलिस सखोल मोहीम राबवेल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की नायलॉन मांजावर बंदी आहे. त्याची विक्री आणि वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. योगींनी पोलिस प्रमुखांना निर्देश दिले की या अवैध नेटवर्कची ओळख पटवा. तात्काळ छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करा.

