तिरुवनंतपूरम : आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकवल्यानंतर आता दीप्ती शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने या विक्रमाला गवसणी घालत वर्षाचा शेवट एकदम अविस्मरणीय केला.
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम
दीप्ती शर्मा (भारत)
सामने: १३३
इकॉनॉमी: ६.१
बळी: १५२
मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)
सामने: १२३
इकॉनॉमी: ६.४
बळी: १५१
हेन्रियेटा इशिम्वे (युगांडा)
सामने: ११७
इकॉनॉमी: ४.३
बळी: १४४
निदा दार (पाकिस्तान)
सामने: १६०
इकॉनॉमी: ५.७
बळी: १४४
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
सामने: १०१
इकॉनॉमी: ६.०
बळी: १४२

