जिंतूर : नगर परिषद जिंतूर व नगर परिषद सेलू अंतर्गत जिंतूर व सेलू शहरातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना, शबरी आवास योजना व इतर घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित आहे. हे हप्ते तात्काळ वितरीत करण्यात यावेत या मागणीचे निवेदन माजी आ. विजयराव भांबळे यांनी दिले आहे.
अनेक लाभार्थ्यांचे घरकुल काम पूर्ण झाले असून आज पर्यंत सदर लाभार्थ्यांना घरकुल हप्त्याचे वितरण झाले नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी स्वत:चे घर पाडून नवीन बांधकाम चालू केल्यामुळे त्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सर्व घरकुल योजनेतील तिसरा, चौथा व पाचवा हप्ता तात्काळ वितरित करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजी आ. भांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर प्रतिलिपी मुख्याधिकारी नगर परिषद जिंतूर, सेलू यांना देखील दिली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती साबिया बेगम कपिल फारुकी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, दलमीर पठाण, दत्तराव काळे, आहेमद बागबान, शाहेद बेग मिर्झा, मनोहर डोईफोडे, शोएब जानिमिया, इस्माईलशेख, हकीम लाला, पिंटू डोंबे, राहुल सागरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) कार्यकर्ते उपस्थित होते.