22.2 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeसोलापूरसोलापूर विमानतळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याची मागणी

सोलापूर विमानतळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरसाठी अद्यावत विमानतळ सोलापूरकरांच्या सेवेला सुरू होणार असून देश विदेशातील व सर्व राज्यातील प्रवासी विमानाने प्रवास करणार आहेत सदर विमानतळास स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेड व सोलापूर शहरातील तमाम शिवशंभु प्रेमी व संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे करण्यात आली.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कडे ई-मेल द्वारे मागणी करण्यात आली आहे.सोलापूर हे भारतातील लोकप्रिय शहरांपैकी एक आहे आणि भारतातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडलेले शहर होणार आहे.सोलापुरातील शिवशंभु प्रेमींची संघटनेची मागणी चा विचार करुन सोलापूरच्या विमानतळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामांतर करण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा संपर्कप्रमुख छत्रुघन माने शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद शहर कार्याध्यक्ष सिताराम बाबर लखन तकमोगे संघटक तेजस शेळके लखन ताकमोगे बाळासाहेब साळुंखे अमोल जाधव लखन पारसे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR