सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी स्मिता पाटील यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेची चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मारुती फडके यांच्यानंतर आता स्मिता पाटील यांच्याही मागे चौकशी लागली आहे.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उपसंचालक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालीन माध्यमिक शिक्षणधिकारी मारूती फडके हे रजेवर गेल्यानंतर डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांच्याकडे प्रभारी माध्यमिक शिक्षणधिकारीचा पदभार देण्यात आला. कार्यभार सांभाळत असताना वैयक्तिक शिक्षकांना मान्यता दिल्या होत्या. या मान्यतेविरोधात पुणे येथील छात्र कृती समिती उपाध्यक्षांनी तक्रार अर्ज विभागीय शिक्षण संचालक ११ जुलै रोजी दाखल केला होता.
या तक्रार अर्जाची दखल घेत उपसंचालक राजेंद्र आहीरे यांनी माध्यमिक शिक्षणधिकारी सोलापूर यांना स्मिता पाटील यांच्या कार्याकाळातील प्रशासकीय टिपण्या, शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन आहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहीरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमबा मान्यता देताना टिपणी टाकणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते अंतिम आदेश पारित करणाऱ्या स्मिता पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) सोलापूर शिक्षणाधिकारी, (माध्य.) जि.प. सोलापूर यांनी दिलेल्या मान्यतेबाबतची चौकशी करुन फौजदारी गुन्हा कारवाई करण्याबाबत उपाध्यक्ष, छात्र शिक्षक कृती संस्था, पुणे यांनी ११ जुलै, २०२४ निवेदन कार्यालयास केलेले आहे. त्या अनुषंगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे, फडके आणि आता पाटील या तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी लागलेल्या असताना झेडपीच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे लक्ष देणार का? अशी चर्चा झेडपीच्या वर्तुळात होत आहे.