26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयडेरा प्रमुख राम रहीम १५व्यांदा तुरुंगाबाहेर

डेरा प्रमुख राम रहीम १५व्यांदा तुरुंगाबाहेर

ताफ्यासह सिरसा डेरा येथे रवाना ४० दिवसांची पेरॉल

रोहतक : येथील सुनारिया कारागृहात साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या आणि पत्रकाराच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला ४० दिवसांची पॅरोल मिळाली आहे.

गुरमीत राम रहीम याला घेण्यासाठी सिरसा डे-यातून आलिशान गाड्यांचा ताफा पोहोचला, ज्यात दोन बुलेटप्रूफ लँड क्रूझर, २ फॉर्च्युनर आणि २ इतर गाड्यांचा समावेश होता. यावेळी डेरा प्रमुख १५ व्यांदा पॅरोल किंवा फर्लो घेऊन तुरुंगातून बाहेर आला आहे. यापूर्वी डेरा प्रमुख राम रहीम १५ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तुरुंगातून बाहेर आला होता.

राम रहीम २०१७ पासून तुरुंगात २५ ऑगस्ट २०१७ रोजी २ साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात राम रहीमला २० वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर, १७ जानेवारी २०१९ रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तसेच, डेरा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्या प्रकरणात ऑक्टोबर २०२१ मध्ये सीबीआय न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा मिळाल्यानंतर ३ वर्षांनी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमला या प्रकरणात निर्दोष मुक्त केले. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR