15.3 C
Latur
Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रपात्र लाडक्या बहिणींना १२ वा हप्ता आज मिळणार

पात्र लाडक्या बहिणींना १२ वा हप्ता आज मिळणार

मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

कोल्हापूर : राज्यातील लाडक्या बहि­णींना सरकारकडून मिळणा-या हप्त्याची वाट पाहावी लागत असून १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. आता, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २ महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट ३ हजार रुपये मिळाले होते. मात्र, यंदा एकच हफ्ता मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणा-यावर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे. या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार, पुढील १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली होती.

जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR