22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeराष्ट्रीयआसाममध्ये भाविकांच्या बसचा अपघात; १२ जणांचा मृत्यू, २५ जखमी

आसाममध्ये भाविकांच्या बसचा अपघात; १२ जणांचा मृत्यू, २५ जखमी

गुवाहाटी : आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. येथे बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यात १२ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत. गोलाघाटचे एसपी राजेन सिंह यांनी सांगितले की, गोलाघाटच्या डेरगावजवळील बलिजान परिसरात पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बालिजान भागात हा अपघात झाला. गोलाघाट एसपींनी सांगितले की, भाविकांना घेऊन जाणारी बस गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून तिलिंगा मंदिराकडे जात होती. बालिजान परिसरात बसची ट्रकला धडक बसली. अपघात झाला त्यावेळी जोरहाटकडून ट्रक विरुद्ध दिशेने येत होता.

एसपी म्हणाले की, घटनास्थळावरून १० मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते डेरगाव सीएचसीमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर २७ जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते, जिथे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

१२ जणांचा मृत्यू
गोलाघाट जिल्ह्याचे एसपी म्हणाले की, या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. आमचा तपास सुरू असून आम्ही कायद्यानुसार कारवाई करू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR