पालम : पालमा तालुका रिपाई आठवले गटाच्या वतीने रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पालम तालुका शाखेच्या वतीने इंदिरा गांधी अस्थिव्यंग निवासी विद्यालय पालम येथे दि. २५ डिसेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांना चादरी व फळांचे वाटप रिपाइंचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्तीअंबीरे रिपाइंचे तालुका अध्यक्ष भगवानराव येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा तालुका अध्यक्ष माधवराव कोसरे, युवा तालुका उपाध्यक्ष विलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष भास्कर वाव्हाळे, युवा नेते आनिल मस्के शहर अध्यक्ष माधवराव हत्ती अंबीरे, अविनाश सोनकांबळे, पप्पु हत्ती अंबीरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, बी डी देशमुख राहुल सराफ, संजय भगत, कारामुंगे रजीत हत्तीअंबीरे, संभाजी जाधव आदी उपस्थित होते.