माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा

परळी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)नेते धनंजय मुंडे यांवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांना उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले आणि नार्कोटेस्टची मागणी केली.

यावेळी मुंडे म्हणाले, जरांगे ऑन एअर म्हणतात, मला संपवून टाकतील. या विधानानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. गेली ३० वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात पात पाहायची नाही असे शिकवले. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही. माझे जीवन आणि मरण हे गरीबातीली गरीब माणसाला मोठे करण्यासाठी आहे. जरांगेंचे आता अति होत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. याशिवाय, माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करावी, असेही मुंडेंनी यावेळी म्हटले.

निवडणुकीच्या तोंडावर काही तरी नावे घेतात. मी दर सोमवारी गेस्ट हाऊसला बसतो. अनेक लोक येऊन भेटतात. अटक केलेल्यांपैकी कुणी भेटले असेल, बाजूला जाऊन बोलले असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला बोलल्याने मला कळत नाही यात कसला कट रचला जातो. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच. बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे त्यांचेच. आरोप मात्र माझ्यावर करत आहेत. माझ्या जीवनात मर्डरर म्हणून माझी ईमेज केली जात आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन दिले
मुंडे पुढे म्हणाले, मी स्वत: नेहमी मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन देत आलो आहेत. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेता असताना मी आंदोलनांचे समर्थन केले. नगरमधील बलात्कार प्रकरणात मी स्वत: जाऊन आरोपीला पकडून दिले होते. जरांगेंना वाटते की, धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीवरच नसावा. समाजात जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला.

सत्य बाहेर येऊ द्या : मुंडे
मी जातपातीत अडकलेलो नाही. माझे सर्व स्तरांतील मित्र आहेत. पण काही लोकांना माझा सामाजिक आणि राजकीय प्रभाव आवडत नाही. म्हणूनच मला लक्ष्य केले जात आहे. मी १७ तारखेला सभेत जरांगे यांना दोन प्रश्न विचारले, मराठा समाजाला ओबीसीत फायदा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये? यावर चर्चा करूया, पण अजून उत्तर नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदा खुली चर्चा होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या, असे जाहीर आव्हान त्यांनी यावेळी जरांगेंना दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news