28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeअंतरराष्ट्रीयबापाला डिवचू नका

बापाला डिवचू नका

ट्रम्प यांची बाजू घेत रशियन राजदूताचा थेट इशारा

मॉस्को : ग्रीनलँडवर अमेरिकेने ताबा मिळवण्याबाबत युरोपिअन युनिअनने अमेरिकेचा कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे अमेरिकेने या युरोपिअन देशांना १० टक्के कर लादला आहे. आता रशियाचे राजदूत प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी युरोपिअन देशांनाच इशारा दिला आहे.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांना लक्ष्य करत एका पोस्टमध्ये किरिल दिमित्रीव्ह म्हणाले प्रिय उर्सुला वॉन डेर लेयन, बापाला डिवचू नका! ग्रीनलँडला पाठवलेले १३ सैनिक परत घ्या. पाठवलेल्या प्रत्येक सैनिकासाठी तुम्हाला अतिरिक्त १% कर लागू शकतो. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख डॅडी म्हणजेच बाप असा केला होता. या संदर्भावरून दिमित्रीव्ह यांनी युनिअन देशांना इशारा दिला आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले होते, तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला समर्थन करताना मार्क रुट म्हणाले होते, शाळेच्या अंगणात दोन मुले खेळतात त्याप्रमाणे या दोन देशांत लढाई झाले आहे. ते सतत भांडत असतात. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यांना थोडावेळ भांडू दिल्यानंतर ते थांबतात. अशावेळी कधीकधी बापाला कठोर भाषा वापरावी लागते. उर्सुलाच्या एक्स पोस्टमध्ये असे लिहिले आहे की प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ही आंतरराष्ट्रीय कायद्याची मूलभूत तत्त्वे आहेत. ती युरोपसाठी आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आवश्यक आहेत. आम्ही नाटोसह आर्क्टिकमधील शांतता आणि सुरक्षिततेमध्ये आमचे सामायिक ट्रान्सअटलांटिक हित सातत्याने अधोरेखित केले आहे.

अमेरिकेचे भारताला आमंत्रण
गेल्या काही महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमासमध्ये मोठा संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे गाझा पट्टीत हाहाकार सुरू होता. त्यानंतर हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत शांतता निर्माण व्हावी यासाठी २० कलमी कार्यक्रम तयार केला होता. या २० कलमी कार्यक्रमाचा प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन अमेरिकेने इस्रायल आणि हमासला केले होते. अमेरिकेचा हा प्रस्ताव इस्रायल आणि हमासने स्वीकारला होता. त्यानंतर आता इस्रायल आणि हमासमधील संघर्ष कायमचा थांबण्यासाठी आणि गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित करण्यासाठी अमेरिकेकडून गाझा बोर्ड ऑफ पीसची स्थापना करण्यात आली आहे. या गाझा शांती मंडळात सहभागी होण्यासाठी अमेरिकेने भारताला अधिकृत निमंत्रण पाठवलं आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR