20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeउद्योगभारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’चे नाकीनऊ!

भारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’चे नाकीनऊ!

लसून निर्यातीमुळे भारताने चीनचे टेंशन वाढविले चीनची निर्यात ७५ टक्क्यांनी घटली

नवी दिल्ली : जगभरात कुठेही जा चवीसाठी खाद्यपदार्थांमध्ये लसूण अवश्य वापरला जातो. लसणाच्या जागतिक व्यापारात आजवर चीनचा दबदबा असल्याचे दिसते. परंतु, या बाबतीत आता भारताने चीनचे टेंशन वाढविलेले दिसत आहे. एक काळ असा होता की एकटा चीन जगभरात लागणा-या ८० टक्के लसणाची निर्यात करीत होता. पण, भारताची लसणाची निर्यात वाढू लागल्याने चीनचा निर्यातीतील वाटा ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारात प्राचीन काळापासून भारताचे स्थान अग्रेसर राहिलेले आहे. त्या काळात प्रख्यात असलेला मसाल्याचा रुट भारतातून जात होता. भारतीय लसूण पश्चिम आशियायी देश आणि आफ्रिकेत वेगाने लोकप्रिय होत आहे.

चीनमध्ये त्याची लागवड प्राचीन मेसोपोटेमियामध्ये झाली त्याच वेळी झाली असा सिद्धांत आहे. प्राचीन चिनी लोकांनी लसणाचे शक्तिशाली प्रतिजैविक प्रभाव ओळखले आणि चिनी पारंपारिक औषधांमध्ये त्याचा वापर केला, इतर आजारांसह पोटदुखी आणि अतिसार बरे करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. चीनमध्ये वर्षाला सुमारे १० अब्ज पौंड लसणाचे उत्पादन होते. हे सुमारे १.२ दशलक्ष शेतक-यांनी घेतले आहे, पाच प्रमुख वाढणा-या प्रदेशांमध्ये, ज्यांची पिके सहसा दोन एकरपेक्षा कमी जमिनीवर घेतली जातात.

अनेकदा शेंगदाण्यांच्या शेजारी, किंवा शेंगदाण्यांच्या संयोगाने, ज्यामुळे संभाव्य लर्जीन जोखीम वाढू शकते. या ऑपरेशन्स घरच्या बागेप्रमाणेच चालवल्या जातात, जिथे ते जेनेरिक बियाणे वापरतात आणि खते आणि कीटकनाशकांचा वापर दस्तऐवजीकरण करणे आवश्यक नाही आणि त्यांचे नियमन केले जात नाही. कापणीनंतर, लसणाची तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली जाते: दिसायला आनंद देणारा लसूण, जे सुमारे ६०% आहे, ते ताज्या बाजारात पाठवले जाते, २०% पुढील वर्षी लागवड करण्यासाठी राखीव ठेवले जाते आणि उर्वरित भाग फोडणी/प्रक्रिया करण्यासाठी पाठवले जाते.

भारतात ३२.७ लाख टन उत्पादन
इतके सरासरी लसणाचे उत्पादन दरवर्षी भारतात होते. मलेशिया, थायलँड, नेपाळ, व्हिएतनामला याची मोठी निर्यात केली जाते.

२-२.५ कोटी टन चीनमध्ये उत्पादन
इतके लसणाचे उत्पादन चीनमध्ये दरवर्षी घेतले जाते. चीनच्या लसणाला अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मागणी असते.

निर्यातीत १६५ टक्क्यांची वाढ
स्पाईस बोर्डाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत भारताच्या लसणाच्या निर्यातीत तब्बल १६५ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. या कालखंडात भारताने ४७,३२९ टन लसणाची निर्यात केली. २०२१-२२ या संपूर्ण वर्षात भारताने ५७,३४६ टन लसणाची निर्यात केली. मागील वर्षाच्या तुलनेत यात १५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. परंतु, याच कालखंडात चीनच्या लसूण निर्यातीत २५ टक्क्यांची घट झाली.

भारतीय लसून लोकप्रिय
चीनच्या तुलनेत भारतीय लसूण आकाराने लहान असतो. चीनच्या तुलनेत याचा दर कमी असतो. जगातील बाजारात चीनच्या लसणाची किंमत १२५० डॉलर प्रतिटन असते. तर भारतीय लसणाला ४५० ते १००० डॉलर प्रति टन इतका भाव मिळतो. दर कमी असल्याने भारतीय लसूण श्रीमंतांप्रमाणे गरिबांमध्येही लोकप्रिय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR