अहमदाबाद : गुजरात एटीएसने नुकतेच अहमदाबादच्या दाणीलीमडा येथे ४.६ ग्रॅम ड्रग्जसह एका तरुणाला अटक केली होती. आरोपीची चौकशी केली असता त्याचे धागेदोरे यूपीपर्यंत पोहोचले होते, जिथे गुजरात एटीएसने ड्रग्ज बनवणा-या कारखान्यावर छापा टाकून २ जणांना अटक केली.
यासोबतच कारखान्यातून ६ किलो एमडी, ५० किलो लिक्विड आणि २०० किलो कच्चा माल जप्त करण्यात आला. गुजरात एटीएसने या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ आरोपींना अटक केली आहे. यूपीमधील पंकज आणि कपिलने ३०० ग्रॅम ड्रग्ज दिले दोन्ही आरोपी सोहेल उर्फ भु-या मिर्झा आणि फरहान उर्फ भु-या पठाण यांच्या चौकशीदरम्यान असे समोर आले की, यूपीमधील पंकज आणि कपिलने त्यांना ३०० ग्रॅम ड्रग्ज दिले होते. जेव्हा गुजरात एटीएस टीमने पुढील तपास केला, तेव्हा असे निष्पन्न झाले की पंकज आणि कपिल उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात कार्यरत होते. गुजरात एटीएसचे एसपी के. सिद्धार्थ यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. ही टीम १२ दिवसांपासून अनेक संशयास्पद ठिकाणांची चौकशी करत होती, तेव्हा एका दुर्गम भागात पंकज आणि कपिलच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या, ज्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली.
दाणीलीमडा येथून अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत यूपीपर्यंत पोहोचले गुजरात एटीएसचे डीवायएसपी एसएल चौधरी यांनी माहितीच्या आधारे दाणीलीमडा येथून आरोपी साफ्ता अहमद फारूकला ४.६ ग्रॅम ड्रग्जसह अटक केली. चौकशीत असे समोर आले की त्याला सोहेल उर्फ भु-या मिर्झा आणि फरहान उर्फ भु-या पठाणने ड्रग्ज दिले होते, ज्यांना पोलिसांनी अटक केली.

