22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रतब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त

तब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त

पुणे पोलिसांची बंगळूरूत कारवाई

पुणे : महाराष्ट्राच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने बंगळूरू येथे कारवाई करीत तब्बल ५५ कोटी ८८ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. तसेच या अमली पदार्थाचे तीन कारखानेही नष्ट केले आहेत. या कारखान्यांतील ड्रग्ज देशातील अनेक शहरांत वितरित केले जात होते. त्यातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक केली आहे, तर त्यांचे दोघे साथीदार फरार आहेत.

महाराष्ट्र शासनाने अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यची स्थापना केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात ७ ठिकाणी विभागीय कृती कार्यालये स्थापन झालेली असून अमली पदार्थ तस्करीविरोधी पथकांनी कारवाईस सुरुवात केली आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रच्या कोकण पथकाने २१ डिसेंबर रोजी नवी मुंबईत वाशी गावातील पुणे-मुंबई महामार्गाजवळ जुना बसथांबा येथे अब्दुल कादर रशीद शेख याला पकडून १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये किमतीचे १ किलो ४८८ ग्रॅम एमडी जप्त केले होते. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR