22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात आजारांचे ग्रहण

बुलडाण्यात आजारांचे ग्रहण

केस गळती, नखे गळती नंतर हाताला भेगा आरोग्य पथक गावात दाखल

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यात मागील सहा- सात महिन्यांपासून केस गळती तसेच नख गळतीचा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. नेमका हा आजार कोणत्या कारणामुळे होत आहे; याचे कारण समोर आले नसताना आणखी एका नव्या आजाराने बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे आरोग्य पथक लागलीच गावात दाखल झाले असून ग्रामस्थांची तपासणी सुरु केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सर्वात प्रथम केस गळती होऊन टक्कल पडले होते. याचे निदान होत नाही तोच अनेकांची नख गळती झाली होती. यानंतर आता मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय आरोग्य तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेने भेगा पडल्याच्या आजाराची गंभीर दखल घेतली.

दरम्यान मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथील २० गावाक-यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुखमध्ये दाखल झाले आहे. ह्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता जिल्हास्तरावरील जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांच्यासह पथक उपस्थित होते.

तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले कारण
पथकाने २० रुग्णांची तपासणी केली असून त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहेत. मागील १- २ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडुन रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले. तर सदर आजार हा संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही. विविध प्रकारच्या प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार (ऑटोम्मुने) पध्दतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टर तांगडे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR