17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय जाहीरनाम्यांचा भूलभुलैया !

जाहीरनाम्यांचा भूलभुलैया !

एकमत ऑनलाईन

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारराजाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आश्वासनांची खैरात सुरू आहे. वचननामे-जाहीरनाम्यांचा महापूर आला आहे. महाराष्ट्राने परतीच्या पावसाचे रट्टे खाल्ले तर बिहारची जनता वचननाम्यांच्या महापुरात गटांगळ्या खात आहे. राजकीय पक्ष वचननाम्यातून जी आश्वासने देतात ती आश्वासनपूर्ती कधीच होत नाही हे जनतेला चांगले ठाऊक आहे तरीसुद्धा जनता राजकीय नेत्यांच्या मधाळ बोलीला बळी पडतेच. मतदारराजा आता खूप शहाणा झाला आहे असे कितीही म्हटले जात असले तरी शेवटी तो आश्वासनांच्या भूलभुलैयात अडकतोच आणि नंतर पाच वर्षे आपल्या नशिबाला बोल लावत बसतो. राजकीय पक्ष कितीही चांगले-वाईट असले तरी अखेर कोणाची तरी निवड करावीच लागते. बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी २८ ऑक्टोबरला ७१ मतदारसंघांत, दुस-या टप्प्यासाठी ३ नोव्हेंबरला ९४ मतदारसंघांत तर तिस-या टप्प्यासाठी ७ नोव्हेंबरला ७८ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. सर्व टप्प्यांची १० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे, सावज टिपण्यासाठी मचाण उभारले जात आहेत. भाजपतर्फे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पक्षाचा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती बिहारवासीयांना मोफत देण्याचे आश्वासन आहे. त्यामुळे विरोधकांना भाजपवर टीकेची झोड उठवण्यास आयते कोलीत मिळाले. महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राला लस देणार की नाही? असा सवाल केला आहे. कोरोना विषाणूमुळे नागरिक त्रस्त आहेत.

कोरोना लसीची प्रतीक्षा आहे पण भाजपने बिहार निवडणुकीच्या तोंडावर बिहारी जनतेला मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. तसे असेल तर महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून कोरोनाची लस देणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. लसीसाठी देशातील जनतेचा पैसा खर्च होणार आहे. मग फक्त बिहारवासीयांनाच मोफत लस का? या आश्वासनाद्वारे भाजपला काय साध्य करायचे आहे? अर्थात या प्रश्नातच उत्तर दडले आहे! असे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करायची हे उघड आहे. कोरोनाची लस प्रत्येक भारतीयाला मिळालीच पाहिजे हे केंद्र सरकारने लक्षात ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांचे बिहारवर अधिक प्रेम असल्याचे भाजप नेते आणि बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

त्यामुळे असेल बिहारवर अधिक प्रेम पण याचा अर्थ महाराष्ट्रावर प्रेम नाही असा घ्यायचा का? कोरोना विषाणूविरोधी लसीचा पुरवठा करण्यासाठी मोदी सरकारने ५१ हजार कोटींचे बजेट ठेवले आहे. अनेक देश कोरोना लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात भारताचाही खारीचा वाटा आहे. लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीमागे ४५० ते ५५० रुपये खर्च येईल असा मोदी सरकारचा अंदाज आहे. एका अहवालानुसार भारतातील एका व्यक्तीला दोन इंजेक्शनची गरज असेल. प्रति व्यक्ती लसीचा दर ६ ते ७ डॉलर्स शिवाय लसीची साठवण आणि वाहतुकीसाठी आणखी २ ते ३ डॉलर्स खर्च येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी सीरम इंडियाचे मुख्य कार्यकारी आदर्श पूनावाला यांनी लस विकत घेण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ आहे का? अशी विचारणा केली होती. सीरम ही जगातील सर्वांत मोठी लसउत्पादक संस्था आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या पाहता लसीकरणासाठी सुमारे ८०० अब्ज रुपये लागतील. असो.

भाजपच्या वचननाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अर्थात प्रत्येक पक्षातील नेतेमंडळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातूनच आश्वासने दिली जातात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजप सरकारवर शरसंधान करताना बिहारसारखी मोफत लस देण्याची घोषणा उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांसाठी का नाही? असा सवाल करून निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल असे म्हटले आहे. कोरोना विषाणू लस अजून अस्तित्वात नाही. परंतु भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीत मोफत लसीकरणाची घोषणा करून टाकली. त्यावर भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. कोरोना लस अद्याप अस्तित्वात नाही परंतु निवडणुकीत ती एक ‘जुमला’ होऊन बसली आहे अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. केंद्र सरकारने सर्व राज्यांतील जनतेला समान न्याय दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या.भाजपने १९ लाख नोक-या देण्याचे आश्वासनही वचननाम्यात दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ५० उमेदवार उभे केले आहेत.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, गुलाबराव पाटील, चंद्रकांत खैरे आदी महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. निवडणुकीत शिवसेनेला ‘बिस्किट’ हे चिन्ह देण्यात आले होते. परंतु त्यावर शिवसेनेने निवडणूक आयोगाला आपली नाराजी कळवली त्यामुळे त्यांना आता ‘तुतारी फुंकणारा मावळा’ हे चिन्ह देण्यात आले आहे. भाजपला धक्कातंत्र देण्याची सवय आहे परंतु हे तंत्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक असताना आता भाजपलाच एक मोठा धक्का बसला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तसा त्यांना हा दुसरा धक्का आहे. याआधी भाजपचे स्टार प्रचारक शहानवाज हुसैन यांची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली होती. शहानवाज यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर राजीव प्रताप रुडी, सुशील मोदी आणि मंगल पांडेय यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते. भाजपने मोफत लस देण्याचे आश्वासन देऊन देशात फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोपांचे रण माजणारच!

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...