17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय अ‍ॅडव्हांटेज इंडिया!

अ‍ॅडव्हांटेज इंडिया!

एकमत ऑनलाईन

चीनचा विखारी विस्तारवाद व जागतिक महासत्ता बनण्याची असुरी महत्त्वाकांक्षा जगापासून लपून राहिलेली नाहीच! चीन आपल्या अर्थशक्तीच्या जोरावर आशिया खंडातील शेजारी देशांना अक्षरश: मांडलिक बनवत चालला आहे. शिवाय लष्करी सामर्थ्याच्या बळावर शेजारी राष्ट्रांचे भूभाग बळकावण्याचे उद्योग चीनने उघड-उघड सुरू केले आहेत. त्यामुळे बहुतांश शेजारी राष्ट्रांसोबत चीनचे वर्तन दादागिरीचेच राहिले आहे. त्यातून चीन शेजारी राष्ट्रांशी कुरापती उकरून काढतो आहे. कोरोना जागतिक महामारीने अवघे जग संकटात सापडलेले असतानाही चीनला आपल्या विखारी विस्तारवादाची उबळ रोखता आलेली नाहीच. त्यातूनच चीनने भारतासोबत कुरापती सुरू केल्या. भारतीय जवानांनी लाल सैनिकांच्या आगळिकीला चोख उत्तर देऊन चीनचे थोबाड रंगवले असले तरी अद्याप चीनने आपले सैन्य माघारी घेतलेले नाहीच. चर्चेच्या अनेक फे-या सुरू असल्या तरी सीमेवर तणावाची स्थिती कायमच आहे.

भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष युद्धाची शक्यता खूपच कमी असली तरी सीमेवर कायम कुरापती सुरू ठेवून तणाव निर्माण करत भारताला कायम अशांत, अस्वस्थ ठेवण्याची चीनची रणनीती एव्हाना स्पष्ट झालेली आहेच. त्यामागे आशिया खंडातील आपला भारतासारखा सबळ स्पर्धक देश आर्थिक विकासाच्या बाबतीत अशांततेमुळे मागे पडावा, हीच कूटनीती आहे. भारत आपल्या परीने चीनला प्रत्येक आघाडीवर सक्षमपणे प्रत्युत्तर देत असला तरी चीनच्या आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या ताकदीमुळे दबाव भारतावरच आहे हे सत्य नाकारता येत नाही. राजकीय हेतूंमुळे भारतातले सत्ताधारी व विरोधकही हे सत्य स्वीकारण्याचे टाळून आपापले राजकीय अजेंडे पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात, हे अलहिदा!

मात्र, देशात कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर असला तरी वास्तव बदलत नाही, हेच सत्य! ते बदलून चीनची दादागिरी झुगारून द्यायची असेल तर भारताला राजकीय दावे-प्रतिदावे किंवा वल्गनांची नव्हे तर देश सामरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीच्या ठोस ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची गरज आहे. त्यामुळे देशाने पूर्वीचे तटस्थतेचे स्वीकारलेले जागतिक पातळीवरील धोरण आता बदलणे भाग आहे. अमेरिका व चीन या दोन आर्थिक महासत्तांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसतो आहे व यापुढेही बसणार आहे. अशावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी व हित जोपासण्यासाठी ठोस भूमिका घेणे, इतर देशांशी सहकार्य वाढविणे आणि त्याद्वारे आपले सामर्थ्य वाढविणे, याशिवाय दुसरा मार्ग नाही. चीन भारताला प्रतिस्पर्धी समजतो हे स्पष्टच झाल्याने आता या देशाशी सहकार्य वाढविण्याचा भारताचा मार्ग खुंटलाच आहे.

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार! – परिवहन मंत्री अनिल परब

शिवाय चीननेच भारतासोबत आक्रमक पद्धतीने कुरापती सुरू करून आपली भारताबाबतची भूमिका व धोरणे स्पष्टच केली आहेत. अशावेळी चीनपासून स्वत:चा बचाव करायचा तर चीनविरोधी तुल्यबळ आघाडीत सामिल होणे, हा शहाणपणाचाच मार्ग! तेथे तटस्थतेचे धोरण स्वीकारणे म्हणजे ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच’, हीच स्थिती! मोदी सरकारला हे शहाणपण सुचले व भारत-अमेरिका दरम्यान सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला संरक्षणविषयक ‘बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन अ‍ॅग्रिमेंट’ अर्थात ‘बेका’ करार झाला त्याबद्दल सरकारचे अभिनंदनच! कोरोनानंतर जगाची व जागतिक राजकारणाची जी फेरमांडणी सुरू झाली आहे त्यात भारताचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करणारा हा अत्यंत महत्त्वाचा करार आहे. विशेष म्हणजे हा महत्त्वाचा करार होताना तो केवळ भारताची एकट्याची गरज म्हणून झालेला नाही.

अमेरिकेलाही भारतासारख्या प्रभावशाली देशाशी हा करार करणे चीनच्या वाढत्या प्रभुत्वाला रोखण्यासाठी तेवढेच आवश्यक व गरजेचे होते. त्यामुळे हा करार निव्वळ भारतावर उपकार म्हणून किंवा सहानुभूतीपोटी झालेला नाही तर समान गरजेपोटी झालेला सन्मानजनक मैत्रीपूर्ण करार आहे, हे भारताच्या दृष्टीने अत्यंत सुखावहच! शिवाय हा करार करून आता भारतानेही चीनची दादागिरी खपवून न घेण्याचा आणि येत्या काळात चीनची प्रतिस्पर्धा स्वीकारून ती शिंगावर घेण्याचा मानस स्पष्टच केला आहे. भारत-अमेरिका मैत्रीपर्व कायम राहणार व वरचेवर दृढ होत राहणार, हा संदेश या कराराने चीनला मिळाला आहे. त्याने चीनवर जी दहशत निर्माण झालीय ती चीनच्या जळफळाट करणा-या प्रतिक्रियांतून स्पष्टच झाली आहे! शिवाय चीन पाकिस्तानला आपल्या ताटाखालचे मांजर बनवत भारतावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न सातत्याने करत होता त्यालाही या कराराने ‘शह’ बसला आहे.

आता भारताच्या सीमांवर कुरापती करताना, आगळिक करताना चीन, पाकिस्तान या देशांना शंभरवेळा विचार करावा लागेल. कारण भारताकडून या कागाळ्यांना मिळणारे उत्तर आता कैकपटींनी अचूक, परिणामकारक व तीव्र असेल, यात शंका नाही. या करारान्वये अमेरिकेकडे उपग्रहाच्या अत्युच्च तंत्रज्ञानाने प्राप्त झालेली अचूक माहिती भारताला प्राप्त होणार आहे, जी लष्करीदृष्ट्या भारताचे बळ कैकपटींनी वाढविणारी ठरणार आहे. कारण भारताकडे जरी लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे असली तरी त्याद्वारे लक्ष्याचा अचूक भेद करण्याचे तंत्रज्ञान भारताकडे नाही. या करारामुळे भारताला अमेरिकेकडून हे परिणामकारक तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. याचा फायदा युद्धात तर होईलच पण इतर वेळीही चीन, पाकिस्तानच्या काय हालचाली सुरू आहेत याची खडान्खडा माहिती भारताला या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त होणार आहे. अर्थात माहितीची ही देवाण-घेवाण भारत व अमेरिका या दोन्ही देशांकडून एकमेकांना होईल. ती एकतर्फी असणार नाहीच.

हिंद प्रशांत संकल्पनेचे महत्त्व

त्यामुळे अमेरिका हा करार करून भारतासोबतचे मैत्रीपर्व वृद्धिंगत करण्याची स्पष्ट ग्वाही जगाला देते आहे. कोरोनानंतरच्या जागतिक फेरमांडणीतील भारत-अमेरिका मैत्रीपर्वाचा हा स्पष्ट संदेश अनेक आघाड्यांवर महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. यापुढे भारत अमेरिकेचा पक्का मित्र राहणार, हेच या कराराने जगासमोर स्पष्ट केले आहे. भारतासाठी ही बाब महत्त्वाची तर आहेच पण सर्वच आघाड्यांवर स्वत:चे सामर्थ्य वाढविण्यासाठी हे मैत्रीपर्व पूरक ठरणारे आहे. हा करार भारतासाठी सद्य:स्थितीत ‘अ‍ॅडव्हांटेज इंडिया’ ठरला आहे. भारत त्याचा किती योग्य व अचूक वापर करून घेतो यावर भारताचे महासत्ता बनण्याचे स्वप्न अवलंबून राहणार आहे. भारत-अमेरिकादरम्यानचे हे मैत्रीपर्व केवळ चीनविरोधी आघाडी एवढ्यापुरते मर्यादित न राहता त्याचा सर्वच आघाड्यांवर विस्तार व्हायला हवा व योग्य वापरही व्हायला हवा! त्यासाठी भारताला आर्थिक व इतर क्षेत्रांमध्येही जोमाने प्रगती करून आपले सामर्थ्य वाढवायला हवे तरच हे मैत्रीपर्व सन्मानजनक राहील अन्यथा त्याला भारत अमेरिकेचा आश्रित बनल्याचे रूप येईल! हा धोका भारताने कायम स्मरणात ठेवणे हिताचे, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...