21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home संपादकीय वायुप्रदूषण.. गंभीर समस्या

वायुप्रदूषण.. गंभीर समस्या

एकमत ऑनलाईन

भारतात प्रदूषणाची स्थिती वरचेवर गंभीर बनत चालली आहे. वायुप्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार ५.२ वर्षे तर राष्ट्रीय मानकानुसार २.३ वर्षांनी कमी होत आहे. शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार भारतातील १.४ अब्ज लोकसंख्येचा एक मोठा भाग अशा ठिकाणी राहतो जिथे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानदंडापेक्षा सरासरी जास्त प्रदूषण आहे. ८४ टक्के लोक अशा ठिकाणी राहतात जिथे भारताने ठरलेल्या मानकापेक्षा प्रदूषणाची पातळी जास्त आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, १९९८ ते २०१८ पर्यंत भारतातील प्रदूषणात ४२ टक्के वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार जर वायू प्रदूषण कमी केले तर दिल्लीकरांचे वय ९.४ वर्षे वाढू शकते.

बांगला देश, भारत, नेपाळ व पाकिस्तान या चार देशांत जगातील सुमारे एकचतुर्थांश लोकसंख्या असून त्यांचा सर्वाधिक प्रदूषण असणा-या देशांच्या यादीत समावेश आहे. उत्तर भारत हा दक्षिण आशियातील सर्वांत प्रदूषित भाग असल्याचे दिसून आले आहे. जागतिक मानकानुसार प्रदूषण कमी झाले तर बंगाल आणि बिहारमधील लोकांचे वय सात वर्षांपेक्षा जास्त वाढू शकते. लखनौमधील लोकांचे वय झपाट्याने कमी होत आहे. कारण तेथे प्रदूषणाची पातळी अधिक आहे. प्रदूषणाची पातळी कमी झाल्यास हरियाणातील लोकांचे वय ८ वर्षांनी वाढू शकते. वायुप्रदूषणाचा सर्वांधिक फटका गंगा नदीच्या किना-यावर राहणा-या लोकांना बसतो आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसीने काढलेल्या निष्कर्षानुसार गंगा पठारावर राहणा-या लोकांचे आयुष्यमान ७ वर्षांनी घटले आहे. पठारावर होणारे प्रदूषण देशातील प्रदूषणापेक्षा तिपटीने अधिक आहे.

गंगा नदीच्या पठारात बिहार, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. या राज्यांत देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४० टक्क्यांहून अधिक लोक राहतात. गत १८ वर्षांत या राज्यांतील प्रदूषणात दुपटीने वाढ झाली आहे. गंगा पठारावरील प्रदूषणात ७२ टक्क्यांनी वाढ झाल्याने तेथील लोकांचे आयुष्य ३.४ ते ७.१ टक्क्यांनी घटले आहे. हे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने जनतेच्या सहकार्यासह अथक प्रयत्न केले पाहिजेत. ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू’ कार्यक्रमांतर्गत ठरवलेले लक्ष्य गाठता आले तर गंगा पठारावरील लोकांचे सरासरी आयुर्मान १.३ वर्षांनी वाढू शकते. प्रदूषणाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसला आहे. वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. गतवर्षी करण्यात आलेल्या पाहणीनुसार दिल्लीतील हवा सर्वांधिक प्रदूषित होती.

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. शिवाय राज्यातील नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना, पंढरपूर, कोल्हापूर, लातूर, उल्हासनगर, अकोला, अमरावती, बदलापूर, चंद्रपूर आदी शहरांतील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. स्थानिक प्रशासनाने प्रदूषण समस्येकडे दुर्लक्ष केल्याने प्रदूषण वाढले असे त्या वेळी सांगण्यात आले होते. पर्यावरण मंत्रालयाने देशातील १०२ प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली होती आणि यासंबंधी त्वरित ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवा, अशी सूचना केली होती. मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि लातूर या शहरांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ सादर केला होता.; परंतु सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने तो नाकारून पुन्हा नवीन प्लॅन देण्याची सूचना केली आहे. सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोना विषाणू अवतरला. त्याने केलेल्या हाहाकारामुळे सारा देश ठप्प झाला. टाळेबंदीमुळे सारे व्यवहार थांबले, उद्योगधंदे बंद झाले. पर्यायाने वायू प्रदूषण निवळण्यास मदत झाली. दरवर्षी करोडो रुपये खर्चूनही गंगा नदी मैलीच दिसत होती पण लॉकडाऊनमुळे ती स्वच्छ झाली, तिचा तळ दिसू लागला. आता हळूहळू जनजीवन सुरू झाल्यामुळे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होणार असे दिसते.

वायुप्रदूषण वाढू लागले की आरोग्याच्या समस्या वाढणार. सर्दी, पडसे, खोकला डोळ्यांची जळजळ, अस्थमा आदी आजार डोके वर काढणार. हे सारे टाळण्यासाठी घराची साफसफाई करावी लागेल. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धुळीपासून बचाव करावा लागेल. दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यावे लागेल. गरम पाणी-दूध यावर भर द्यावा लागेल. वायुप्रदूषणामुळे फक्त फुफ्फुस व हृदयावरच परिणाम होतो असे नाही तर तरुण पिढीच्या मेंदूवरही गंभीर परिणाम होतो, असे नवीन संशोधनातून समोर आले आहे. सध्या ९० टक्के लोक हे दूषित हवेत श्वास घेत आहेत. त्यामुळे अल्जायमर, पार्किन्सससारखे मज्जातंतूशी निगडित आजार होत आहेत. बहुतेक मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषणाच्या अभ्यासानुसार वाढते प्रदूषण आणि मुलांचे मनोविकार यांचा जवळचा संबंध आहे. वायुप्रदूषण वाढत असताना मेंदूचे नुकसानही वाढत असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली शहराला वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे.

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

हरियाणासह पंजाब येथे पेंढा जाळण्यात येत असल्याने त्याचा परिणाम दिल्लीत धुराची चादर पसरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतातील हवा अत्यंत घाणेरडी आहे असे म्हटले आहे. वायुप्रदूषणाची समस्या गंभीर होण्यास भारताने मोठा हातभार लावल्याचा आहेरही त्यांनी दिला. याच ट्रम्प महाशयाचा भारत दौ-यात पंतप्रधान मोदींनी उदोउदो केला होता. वायुप्रदूषणाचा प्रत्येकाला त्रास होऊ शकतो परंतु नवजात मुलांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार २०१९ मध्ये वायुप्रदूषणामुळे सुमारे १.१६ लाखांहून अधिक नवजात मुलांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण सांगता येत नसले तरी प्रदूषणाचा विपरीत परिणाम गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवर झाला हे नक्की. २०१९ मध्ये वायुप्रदूषणामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचे अन्य आजार वाढले. त्यामुळे जगभरात सुमारे ६७ लाख लोकांचा बळी गेला. भारतात सुमारे १६.७ लाख लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशात जागतिक मानकानुसार हवेची गुणवत्ता राखली गेली पाहिजे.

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...

स्वातंत्र्य हवेच; पण स्वैराचार नको!

स्वातंत्र्य हे सर्वांनाच प्रिय आहे व लोकशाही व्यवस्थेचा तर तो आत्माच आहे. मात्र, त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्यात अंतर्भूत असणारी जी जबाबदारी आहे त्याचे...

‘व्होटकटवा’ची बिहारी बोधकथा!

बिहार हे भारतीय राजकारणातील दिशादर्शक मानले जाणारे राज्य! देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या गलबतांना राजकारणाच्या अथांग समुद्रात आपण योग्य मार्गावर आहोत की, आपला रस्ता हुकलाय,...

‘तेजस्वी’ टक्कर !

ऐन कोरोना काळात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत उत्कंठावर्धक ठरला. मंगळवारी निकालाच्या उत्सुकतेने टी.व्ही.च्या पडद्यासमोर बसलेल्या भारतीयांना निकालाच्या कलांनी व क्षणोक्षणी बदलत चाललेल्या...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...