25 C
Latur
Thursday, October 22, 2020
Home संपादकीय पोशाखाचा अस्सल कलाविष्कार!

पोशाखाचा अस्सल कलाविष्कार!

एकमत ऑनलाईन

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण म्हणतो व ते सत्यही आहे. अर्थात बदलत्या काळात व बदलत्या जीवनशैलीत या मूलभूत गरजांची यादी जशी वाढत जाते तसेच या गरजा निव्वळ गरजा न राहता त्यात सुधारणांचा व कलात्मकतेचा अंतर्भाव व्हायला सुरुवात होते आणि मग त्याचे एक शास्त्र निर्माण होते. हा मानवी उत्क्रांतीच्या अविरत चक्राचा भागच! मात्र, जेव्हा गरजांची पूर्तता करताना त्यात कलात्मकतेचा आविष्कार समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होतो तेव्हा आपल्या पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होऊन रुजलेल्या घट्ट संकल्पना सहजपणे किंवा लवकर हे कलाविष्कार स्वीकारायलाच धजावत नाहीत. मग अशा कलाविष्कार करणा-या कलाकाराचे मोठेपण मान्य करणे, त्याला कलाकार म्हणून सर्वसामान्यांची पसंती मिळणे, त्याची कला लोकप्रिय, लोकमान्य होऊन त्यावर मोहर उमटणे, त्याच्या कलेचे चीज होणे तर लांबच पण तो कलाकार व त्याचा कलाविष्कार सामान्य जनांना ज्ञातही होत नाही.

त्यासाठी त्याच्या कलेवर एखाद्या ख्यातनाम पुरस्काराची मोहर उठेपर्यंत त्या कलाकाराला लोकमान्यतेची व लोकप्रियतेची प्रतीक्षाच करावी लागते. मात्र, त्यामुळे त्याची कलासक्ती संपते असेही नाही की, कलाविष्कार थांबतात असेही नाही. रसिकांची पसंती ही कलाकाराची भूक असली तरी त्याची कलेवरची निष्ठा, प्रेमही तेवढेच निस्सीम व सच्चे असते. त्यातून त्या कलाकाराला अविरत कार्यरत राहण्याची ऊर्जाही मिळते आणि पे्ररणाही! असो!! या प्रवासात कलाकार आपल्या अविरत प्रयत्नाने व प्रयोगाने सातत्याने त्या क्षेत्रात भर घालतच राहतो. नवनवे आविष्कार घडवत राहतो आणि मग त्या कलाकाराच्या नकळत ते एक शास्त्र बनून जाते. मूलभूत गरजा या निव्वळ गरजा न राहता त्याचे एक समृद्ध व अधिकृत शास्त्र जन्माला येते. भारतात पोशाखाचे असेच शास्त्र जन्माला घालून त्यावर लोकमान्यतेचीही मोहर उमटवून घेणा-या कलाकार म्हणजे श्रीमती भानू अथय्या!

पोशाखाची कला विकसित करतानाच अनेक अजरामर कलाविष्काराने हे क्षेत्र अक्षरश: समृद्ध करून टाकणा-या व सर्वसामान्यांना या क्षेत्राची ओळख करून देतानाच या क्षेत्रातील विविधतेचे, समृद्धतेचे दर्शन घडवणा-या भानू अथय्या आपल्या या कलेवरील निस्सीम प्रेमामुळे १९५६ ते २०१५ पर्यंत तब्बल सहा दशके अविरत कार्यरत राहिल्या आणि त्यांनी भारतीय वस्त्र परंपरेला आपल्या कलाविष्काराची, आधुनिकतेची जोड देत त्याला जगत्मान्यता मिळवून दिली. मात्र, त्यांच्या या कलेवर लोकमान्यतेची मोहर उमटण्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त होण्याची प्रतीक्षा करावी लागली. ऑस्कर पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय कलाकार हा मान मिळाल्यानंतरच ‘मी फॅशन डिझायनर नाही, मी करते ते कॉस्च्यूम डिझाईन’ या त्यांच्या दाव्याला लोकमान्यता मिळाली. तोवर त्यांनी आपल्या या कलाविष्काराने अनेक कलाकृती अक्षरश: अजरामर करून टाकल्या असल्या तरी त्यांचा ‘हे एक शास्त्र आहे’, हा दावाही मान्य झाला नाही आणि त्यांच्यावर बसलेला ‘फॅशन डिझायनर’ हा बॉलिवूडमधील परवलीचा शिक्काही पुसला गेला नाहीच! की, यासाठीची त्यांची स्वतंत्र ओळखही सामान्यजनांना झाली नाहीच!

राजभवन, राजकारण व घटनात्मक मर्यादांचे सीमोल्लंघन!

मात्र, १९८२ मध्ये सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी ‘गांधी’ हा महाचित्रपट जगाला दाखविला आणि या चित्रपटाने जगातील चित्रपटनिर्मात्यांच्या तोवर रूढ झालेल्या सर्व संकल्पनाच उद्ध्वस्त केल्या नाहीत तर त्यांना खडबडून जागे करून टाकले. या चित्रपटाने जगभरातील सर्व पुरस्कार तर लुटलेच पण मानाचे ऑस्कर पुरस्कारही पटकावले. त्यातला एक पुरस्कार होता ‘कॉस्च्यूम डिझायनिंग’चा जो भानू अथय्या यांनी प्राप्त केला होता. गांधीजी, कस्तुरबा या पात्रांसह चित्रपटातील एकूणएक पात्राचे भानू यांनी योजिलेले पोशाख एवढे अचूक होते की, त्यामुळे प्रेक्षकांसाठी गेलेला काळ व घडलेला इतिहास जसाच्या तसा जिवंत झाला होता.भानू यांच्या पोशाखकलेच्या आविष्काराचा चित्रपटाच्या यशात व तो कलेच्या इतिहासात अजरामर ठरण्यात सिंहाचा वाटा आहे. पोशाखकलेच्या आविष्कारातून काळ कसा जिवंत करता येतो हे त्यांनी ‘गांधी’नंतरही ‘सिद्धार्थ’, ‘आंबेडकर’ ते अलीकडे तुफान यशस्वी ठरलेल्या आमिर खानच्या ‘लगान’ पर्यंत प्रत्येक चित्रपटात दाखवून दिले आणि पोशाखकला हे स्वतंत्र शास्त्र आहे हे सिद्ध केले.

त्यांच्या दृष्टीने तद्दन व्यावसायिक चित्रपटातील ‘कॉस्च्यूम डिझायनिंग’ हा स्वतंत्र कलाविष्कारच होता व तो त्यांनी तेथेही तेवढ्याच तन्मयतेने, अभ्यासाने, कल्पकतेने व अथक परिश्रमानेच पार पाडला. त्यामुळे तद्दन व्यावसायिक चित्रपटातील त्यांच्या पोशाखकलेचे आविष्कार निव्वळ फॅशन न ठरता ‘ट्रेंड’ निर्माण करणारे अजरामर कलाविष्कार ठरले. हजारो कलाकारांना पोशाखकलेची दृष्टी देणारे व या क्षेत्रात नवीन काही घडविण्याची सतत प्रेरणा देणारे ‘आदर्श’ ठरले! मग गुरुदत्तचा ‘प्यासा’मधला पोशाख असो की, ‘आम्रपाली’तील वैजयंतीमालाची साडी असो. हे पोशाख अजरामर झाले व त्यांनी या क्षेत्रात अक्षरश: ‘ट्रेंड’ निर्माण केले. भानू अथय्या यांनी ‘ट्रेंड’ निर्माण केलेल्या चित्रपटांची प्रचंड मोठी यादी आहे. ‘श्री-४२०’ मधील नर्गिसच्या बंद गळा व कोपरापर्यंत बाह्याच्या ब्लाऊजपासून हिंदी चित्रपटात भानू अथय्या यांनी सुरू केलेला पोशाखकलेचा आविष्कार तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध करत राहिला.

अनेक अभिनेते व अभिनेत्रींच्या वेशभूषेला व पात्रांना अजरामर करत राहिला. भारतीय संस्कृतीची योग्य जाण, अभ्यासू व संशोधनाची वृत्ती, सर्वोत्तमतेसाठी परिश्रमांची कायम तयारी आणि या सगळ्या गुणांना मिळालेली कल्पकतेची जोड यातून भानू अथय्या यांनी अक्षरश: इतिहास घडवला. त्यांनी घडवलेल्या पोशाखकलेच्या आविष्काराच्या अनेक आवृत्त्या बाजारात निघतात व लोकप्रिय ठरतात हा त्यांच्या कलाविष्काराच्या अमरत्वाचा पुरावाच! आपल्या सखोल संशोधनाने व अस्सलतेच्या निग्रहाने त्यांनी ‘वेशभूषेत असते तरी काय?’ या भारतीयांच्या पारंपरिक संकल्पनेला तर उत्तर दिलेच पण आपल्या आविष्काराने या क्षेत्राचे नवे रूप, आयाम दाखवून देत अक्षरश: तृप्त व समृद्ध करून टाकले. परंपरेचे जतन करतानाच त्याला कल्पनाशक्तीने आधुनिकतेची जोड देऊन अजरामर कलाविष्कार कसा घडवता येतो, हे भानू अथय्या यांनी आपल्या प्रत्येक कामातून भारतीयांना व जगालाही दाखवून दिले, पटवून दिले.

घटनेचा विसर न पडो…

भारतीय पोशाखकलेला जगात ओळख, मान्यता व लोकप्रियताही मिळवून दिली. त्यांचे भारतीय असणे जसे अभिमानाचे तसेच मराठी माणसांसाठी त्या मराठी असणे, कोल्हापूरच्या कन्या असणे हे दुहेरी अभिमानाचेच! नवे घडवण्यासाठी इतिहास व संस्कृतीचे पदर अभ्यासले पाहिजेत ही श्रद्धा शेवटपर्यंत कायम ठेवणा-या आणि वेशभूषा ही अभिव्यक्तीची कलात्मक भाषा आहे, हे मानणा-या भानू अथय्या पोशाखकलेवरील असणा-या अगाध श्रद्धेमुळेच अविरत कार्यरत राहून सहा दशके सातत्याने नवनवीन कलाविष्कार घडवत राहिल्या! या कलेचे ‘शास्त्र’ आपल्या साधनेतून व परिश्रमातून घडवत राहिल्या, समृद्ध करत राहिल्या. अस्सल कलाविष्काराचा हा खळखळता झरा आता कायमचा अटला असला तरी त्याने आपल्या प्रदीर्घ प्रवासात मोठा समृद्ध वारसा निर्माण करून ठेवला आहे, जो अजरामर तर आहेच पण भावी पिढ्यांना सदोदित प्रेरणा, ऊर्जा देणारा आहे. या अजरामर अस्सल कलाकाराला ‘एकमत’ची भावपूर्ण आदरांजली!

ताज्या बातम्या

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री...

घसा बसलाय ? कोमट पाणी प्या

पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची...

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

‘ईएसजी’च्या अंतरंगात

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय येताच ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांचाच पर्याय पुढे येतो. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बिगरवित्तीय निकषांकडे म्हणजेच पर्यावरणीय...

अनलॉकनंतरही आधार हवाच!

काही आठवड्यांपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आणि ती अर्थव्यवस्थेची पीछेहाट दाखविणारी होती. जीडीपीचा वृद्धीदर उणे २३.९ टक्क्यांवर घसरल्याचे...

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : हे सरकार शेतक-याच्या खरेच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करा पण शेतक-यांना बोलण्यापेक्षा...

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी...

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक...

खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा !

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू झाला आहे....

आणखीन बातम्या

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

माघार स्वागतार्हच!

सध्याच्या जागतिक अर्थस्थितीत एखाद्या देशाला ठोस आर्थिक प्रगती करायची तर जागतिक अर्थव्यवस्थेतील आपली पत व जागतिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारांचा आपल्यावरील विश्वास कायम राहील, याची दक्षता...

फुकाचा मुखभंग!

आपण ज्या जबाबदार पदावर बसलेलो आहोत त्याचे अधिकार वापरताना आपल्या पदाची जबाबदारी व मर्यादा यांचे योग्य भान ठेवले तरच आपल्या अधिकारांबाबत आक्षेपही निर्माण होत...

दात कोरून पोट भरेल?

देशातील कोरोना साथीचा संसर्ग थोडाफार उतरणीला लागल्याची दिलासादायक आकडेवारी आहे. मात्र, संकट पूर्णपणे टळलेले नाही, हे विसरता कामा नयेच! अर्थात या संकटाने मागच्या सहा...

दयाघना, आवररे… सावररे!

हवाहवासा वाटणारा पाऊस आता नकोनकोसा वाटावा याला काय म्हणाल?... वक्त वक्त की बात... दुसरे काय! मराठवाड्याने असा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. पावसाळी हंगामात...

पदभरतीचे रामायण-महाभारत!

राज्यातील कोरोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण रविवारी २.६४ टक्के होते ते एक टक्क्याच्या आत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शासन स्तरावर यासाठी प्रयत्न होत असताना...

लाल मातीचे राजा-राणी

लॉन टेनिस जगतात अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि फ्रेंच या चार अत्यंत मानाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा मानल्या जातात. विम्बल्डन स्पर्धा ग्रीन कोर्टवर (हिरवळीवर) तर अमेरिकन स्पर्धा...

राजयोगी पर्वाची अखेर!

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने देशाच्या राजकारणाला जशी मोठी कलाटणी दिली होती तशीच कलाटणी ही राजकीय नेत्याच्या तोवर स्थापित व्याख्येलाही दिली. या नव्या व्याख्येतून अनेक...

बाजार समित्या कोलमडतील?

देशासाठी २०२० हे वर्ष अत्यंत वाईट ठरले आहे. सध्या देशात ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत क्लेषदायी आहेत. एकीकडे मुसळधार पावसाने शेतक-यांचे अपरिमित नुकसान...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...