20.8 C
Latur
Saturday, October 31, 2020
Home संपादकीय बेरोजगारीचा भस्मासुर!

बेरोजगारीचा भस्मासुर!

एकमत ऑनलाईन

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. अर्थात या रोगावर मात करणा-यांचे प्रमाणही वाढते आहे, ही बाब दिलासादायकच! मात्र, कोरोनाच्या आकलनात झालेली गल्लत व त्यामुळे योजले गेलेले टाळेबंदीसारखे उपाय यामुळे आरोग्य संकटाएवढेच भीषण अर्थसंकट देशावर कोसळले आहे. तसे या अर्थसंकटाला निव्वळ कोरोना महामारी कारणीभूत असल्याचे चित्र सरकार रंगवू पहात असले तरी ते पूर्ण सत्य नाहीच!

कारण कोरोनाने देशात शिरकाव करण्यापूर्वीही देशाची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेतच होती. ती सावरण्यात सरकार अपयशीच ठरले होते. त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट बनली हे पूर्ण सत्य! मात्र, सरकार हे मान्य करेल, ही अपेक्षा फोलच! उलट देशाच्या अर्थमंत्री ही सगळी ‘देवाची करणी’ असे सांगून वास्तव स्थितीपासून पळच काढतायत! सरकार देशाच्या नाजूक बनलेल्या अर्थस्थितीची जबाबदारीच घेण्यास तयार नाही. मग ते ही स्थिती सुधरवण्याची इच्छाशक्ती दाखवेल, हा आशावाद फोलच! त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता आता हवालदिल न झाल्यास नवल! सध्याच्या परिस्थितीने देशातील प्रत्येक घटक हा वर्तमानाबाबत जेवढा चिंतीत आहे त्यापेक्षा जास्त भवितव्याबाबत भयभीत आहे.

त्यामुळे केंद्राने ‘अनलॉक’चा गजर करून व्यवहार व अर्थचक्र सुरळीत करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाहीच. कारण त्या प्रयत्नांना बाजाराकडून प्रतिसादच मिळत नाही. हा प्रतिसाद का मिळत नाही? तर सरकारने आपल्या अर्थधोरणातील तुघलकी व्यवहाराने बाजारात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. बाजार प्रचंड सावध बनलाय आणि पोकळ आशावादावर विश्वास ठेवण्यापेक्षा आहे ते टिकवून काटकसरीने या परिस्थितीत तग धरून राहण्यावर जास्त भर देतोय! त्यामुळे सरकार जरी बाजारात पैसे ओतायला तयार असले, व्याजदर कमी करायला तयार असले तरी हे कर्ज घ्यायला उद्योजक, बाजार धजावतच नाही. उलट कमी व्याजाने मिळणारे हे कर्ज उत्पादनवाढीसाठी न वापरता आहे ते कर्ज फेडण्यासाठी वापरण्यावर भर दिला जातोय. स्वत: अर्थमंत्रीही ही खंत बोलून दाखवतायत, मात्र, यावरचा उपाय योजण्यास सरकार तयार होत नाही.

मनरेगाने दिला गरिबांना आधार

अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक फिरवायचे तर निव्वळ उत्पादनवाढीवर भर देऊन काहीही साध्य होणार नाही, त्यासाठी बाजारातील मागणी वाढावी लागेल. मागणी वाढली तर उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढले तरच रोजगार टिकेल, वाढेल, हेच बाजाराचे सूत्र! हे सूत्र सरकारने मान्य करण्याची गरज आहे. तरच देशावरचे अर्थसंकट दूर होईल. मात्र, सरकार हे सूत्र स्वीकारण्याची इच्छाशक्तीच दाखवत नाही आणि म्हणून हे संकट दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालले आहे. देशात कोरोना काळात रोजगार गमावणा-यांच्या संख्येवर भाष्य करण्यापूर्वी ही पार्श्वभूमी व तथ्य लक्षात घेणे गरजेचे आहे. हे तथ्य सोडून होणारी चर्चा ही उपाय काढणारी नसेल तर ती राजकीय चिखलफेक या अंगानेच जाईल. दुर्दैवाने आज देशात नेमके हेच घडते आहे.

सरकार या परिस्थितीत स्वत:चा राजकीय बचाव करण्यासाठी कोरोनाच्या कारणामागे लपते आहे आणि विरोधकही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याऐवजी आकडेवारीचे निव्वळ राजकीय भांडवल करण्यावरच भर देतायत! यातून मग कोरोनावरची लस आली की, सगळे काही ठीक होईल, असे चित्र रंगवण्याचा हमखास फंडा वापरला जातो व त्यावरच चर्चा घडवून, केंद्रित करून मूळ समस्येला बगल दिली जाते. आताही जगभर कोरोना लसीवरच चर्चा घडतेय आणि जग या लसी कधी येणार? याकडे डोळे लावून बसलेय. मात्र, कोरोनावरची लस आल्याने आरोग्य संकट दूर होईल किंवा करता येईल. पण त्याने देशात निर्माण झालेले अर्थसंकटही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे दूर होईल, असे गृहित धरणे भाबडेपणाच!

देशातले अर्थसंकट कोरोनाची लस आल्याने दूर होणार नाहीच, त्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध व दीर्घकालीन प्रयत्नांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. कोरोना संकटामुळे देशात आजवर दोन कोटी दहा लाख लोकांनी आहे तो रोजगार गमावला आहे. यात येत्या काळात मोठी भर पडू शकते कारण ही वरवरची आकडेवारी आहे. आपल्या देशात नोंदणीकृत रोजगारापेक्षा अनोंदणीकृत रोजगारावर जीवन जगणा-यांची संख्या कैकपटींनी जास्त आहे. हे वास्तव आपण या आकडेवारीवर चर्चा करताना लक्षात घ्यायलाच हवे! त्यामुळे देशातील बेरोजगारीचे संकट हे ही आकडेवारी दाखवते त्यापेक्षा किती तरी पटींनी मोठे व भीषण आहे. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे तर देशातील बेरोजगारीची समस्या येत्या काळात भस्मासुर ठरणार आहे आणि त्यावर राजकीय अंगाने नव्हे तर आर्थिक अंगानेच उपाय काढावे लागतील तरच ही समस्या नियंत्रणात येईल.

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

अमूक एक पक्ष सत्तेवरून गेला व तमूक पक्ष सत्तेवर आला तर सगळे आलबेल होईल, असे नाहीच. असे चित्र रंगवणे राजकीय पक्षांसाठीची गरज आणि अपरिहार्यता असली तरी त्याला प्रमाण ठरवल्याने काहीही होणार नाही. ना समस्येवर उपाय सापडेल, ना या समस्येची उग्रता कमी होईल! बेरोजगारीच्या समस्येवरचा उपाय हा ‘राजकीय झुलवा’ नाही तर ठोस, नियोजनबद्ध अर्थ धोरण हाच आहे. दुर्दैवाने नेमके असे कुठलेही धोरण नसताना व ते तयार करण्याची इच्छाशक्तीही नसताना देशाला जगातील आर्थिक महासत्ता बनविण्याचे, दरवर्षी कोट्यवधी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची स्वप्ने बिनदिक्कत विकली जातात आणि तत्कालीन राजकीय हित साधले जाते.

त्यावर राजकीय साठमारीही रंगते. मात्र, बेरोजगारीची समस्या दूर कशी होणार? देश आर्थिक महासत्ता कसा बनणार? याचे ठोस धोरण कुणी सांगत नाही की, त्यावर ‘ब्र’ शब्दही काढत नाही आणि हीच खरी भांडवली बाजारासाठीची मूळ समस्या आहे. बाजाराला त्यामुळेच सरकारच्या अर्थधोरणावर विश्वास ठेवण्याचे धारिष्ट्य होत नाही. बाजारातील मागणी वाढणे व वाढविणे हेच उत्पादकता व पर्यायाने रोजगार वाढविण्याचे सूत्र आहे. हे सूत्र जपणारे अर्थधोरण ही देशाची गरज आहे. ही गरज भागली तरच समस्येवर कायमस्वरूपी उपाय सापडेल अन्यथा बेरोजगारीचा भस्मासुर देशाच्याच डोक्यावर हात ठेवून देश भस्म करून टाकेल, हे लक्षात घेण्याची वेळ आता आली आहे. कोरोनाने त्यात भर घातलीय, हे खरे पण कोरोनाबरोबर देशावरील अर्थसंकटही आपोआप संपेल, असे मानणे भाबडेपणाच, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...

आणखीन बातम्या

अ‍ॅडव्हांटेज इंडिया!

चीनचा विखारी विस्तारवाद व जागतिक महासत्ता बनण्याची असुरी महत्त्वाकांक्षा जगापासून लपून राहिलेली नाहीच! चीन आपल्या अर्थशक्तीच्या जोरावर आशिया खंडातील शेजारी देशांना अक्षरश: मांडलिक बनवत...

बाळाच्या जन्मापूर्वीच बारशाचे आमंत्रण !

निवडणूक जाहीर झाली की सर्वच राजकीय पक्षांना कंठ फुटतो. आपली मतांची झोळी भरण्यासाठी त्यांची वारेमाप आश्वासनांची खैरात होते. जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केले जातात. हे...

दोन आनंदाच्या बातम्या…!

निसर्गाचा खेळ मोठा विचित्र आहे. माणसाला त्याचा ठाव लागता लागत नाही. निसर्ग माणसाला कधी हसवतो तर कधी रडवतो. पावसाळी हंगामात बहुतेक वेळा तो डोळे...

धो डाला…!

या वर्षीची विजयादशमी ही सर्वसामान्यांसाठी कोरोनामुळे अनेक बंधनांसह साजरी करावी लागली व त्यामुळे त्याचा उत्साह जरा फिकाफिकाच वाटत असला तरी राज्यातील राजकीय क्षेत्रात मात्र...

वायुप्रदूषण.. गंभीर समस्या

भारतात प्रदूषणाची स्थिती वरचेवर गंभीर बनत चालली आहे. वायुप्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार ५.२ वर्षे तर राष्ट्रीय मानकानुसार २.३...

जाहीरनाम्यांचा भूलभुलैया !

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारराजाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आश्वासनांची खैरात सुरू आहे. वचननामे-जाहीरनाम्यांचा महापूर आला आहे. महाराष्ट्राने परतीच्या पावसाचे रट्टे खाल्ले...

गरज सरो…!

महाराष्ट्रात भाजपचा शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष हा तोंडवळा बदलून जनसामान्यांपर्यंत पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी खस्ता खाऊन पक्षाला जनाधार मिळवून देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मागच्या...

ना रहेगा गरीब, ना रहेगी गरिबी

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासह जागतिक पातळीवरच्या सर्व वित्तीय संस्था, संघटना, अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, अभ्यासक, विचारवंत वगैरे सर्व मंडळी कोरोना जागतिक महामारीने आरोग्याबरोबरच अर्थकारणालाही जो...

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...
1,325FansLike
120FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...