17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय धो डाला...!

धो डाला…!

एकमत ऑनलाईन

या वर्षीची विजयादशमी ही सर्वसामान्यांसाठी कोरोनामुळे अनेक बंधनांसह साजरी करावी लागली व त्यामुळे त्याचा उत्साह जरा फिकाफिकाच वाटत असला तरी राज्यातील राजकीय क्षेत्रात मात्र विजयादशमीचे फटाके जोरदार फुटले. अर्थात त्याची सुरुवात सध्या मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केली व कडव्या शिवसैनिकांना अत्यंत गोड धक्का देणारी ठाकरी आक्रमकता दाखवली. उद्धव यांच्या स्वभावशैलीला छेद देणारे त्यांचे भाषण ठरल्याने ते चर्चेचा विषय होणे साहजिकच! शिवाय त्यामुळे कायम आक्रमक शैलीत वाढलेला शिवसैनिक सुखावणेही साहजिकच! मात्र, भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटल्यानंतर उद्धव यांच्यावर आक्रमक हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करण्याबाबत जी मोठी बंधने आघाडी धर्मामुळे आली आहेत त्यातून त्यांना शिवसेना पक्षप्रमुखाची आक्रमक भूमिका घेण्यावर मोठ्या मर्यादा पडल्या आहेत.

शिवाय स्वत: त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे, त्याचा दबाव आहेच. शिवाय ते स्वत: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्वभावाने आक्रमक नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा घणाघाती व आक्रमक राजकीय टोलेबाजीच्या भाषणाची विरोधकांना तर सोडाच पण सर्वसामान्य शिवसैनिकांनाही अपेक्षा नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाने सर्वांनाच जोरदार धक्का दिला. विरोधकांसाठी हा अपेक्षाभंगाचा धक्का जिव्हारी लागणारा, शिवसैनिकांसाठी सुखद तर मित्रपक्षांना गर्भित इशारा देणारा ठरला. एका दगडात तीन पक्षी बरोबर मारण्याची ही कसरत अत्यंत अवघडच पण ती उद्धव ठाकरे यांनी लीलया पार पाडली व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे वर्णन एका वाक्यात करायचे तर ‘धो डाला’ म्हणणेच समर्पक! विरोधक विशेषत: भाजपने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेल्यावर सेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. हळूहळू या प्रश्नाची धार तिखट करत सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचे आणि आता भाजप हाच हिंदूंचा एकमेव कैवारी, असे चित्र रंगवायला सुरुवात केली होती.

त्यासाठी मंदिर उघडण्यासाठीचे आंदोलनही भाजपने हाती घेतले. त्यात आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, याचे भान न ठेवता राज्यपाल महोदयांनीही उडी घेतली. या सगळ्याने शिवसेना व शिवसैनिक हिंदुत्वाच्या मुद्यावर कोंडीत सापडल्याचे आणि बॅकफूटवर गेल्याचे चित्रही निर्माण झाले होते. सरकारमध्ये असल्याने व हे सरकार तीन पक्षांचे असल्याने साहजिकच उद्धव ठाकरेंना ही कोंडी मुख्यमंत्री म्हणून फोडता येत नव्हती. त्याचा परिणाम शिवसैनिकांच्या मानसिकतेवर होणे अटळच! त्यातून सत्तेत असूनही शिवसेना व शिवसैनिक मरगळलेल्याच स्थितीत होते. या अवस्थेचा पुरेपूर फायदा उठवत सत्ता गमावल्याच्या पोटदुखीने बेजार राज्यातील भाजप नेत्यांनी पातळी सोडून टीका करत सेनेला व उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. एवढी टोकाची टीका होऊनही शिवसेना गप्प कशी? सेनेची आक्रमकता सत्तेमुळे खरेच संपुष्टात आली का? सेना हिंदुत्व सोडणार का? इथपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते व सेना पुळचट झाल्याचे निष्कर्षही पेरले जात होते. शिवाय अधूनमधून सेना पुन्हा भाजपसोबतच येणार, अशा पुड्याही सोडल्या जात होत्या.

गरज शाश्वत आर्थिक संरक्षणाची

या वातावरणाने साहजिकच शिवसेना व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थताही होती आणि संभ्रमाचे वातावरणही होते. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर साहजिकच याचा पक्षसंघटनेच्या दृष्टीने दबाव होताच. पक्षातील संभ्रम दूर करून शिवसैनिकांचे मनोबल वाढविण्याचे आव्हानही उद्धव ठाकरे यांच्यासमोर होते आणि पिंज-यात अडकलेल्या वाघासारखी त्यांची अवस्था दिसत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे निमित्त साधून हा पिंजरा तोडला व डरकाळी फोडली. एवढेच नाही तर ठाकरे शैली वापरत विरोधकांना अक्षरश: धुऊन काढले व शिवसैनिकांच्या धगधगत्या निखा-यावरील जमलेली राख एका फटक्यात दूर केली. शिवाय अपप्रचाराला रोखठोक उत्तरे देत, असा प्रचार करणा-यांचा समाचारही घेतला आणि समर्पक उदाहरणांसह वस्त्रहरणही केले. त्यांचा हा अनपेक्षित अवतार विरोधकांसाठी जोरदार धक्काच होता. त्यातून सावरायला भाजप नेत्यांना बराच वेळ लागेल. मात्र, उद्धव यांचे ठाकरी प्रहार भाजपच्या जिव्हारी लागले. त्याचे पडसाद दुस-या दिवशी दिसलेच!

नारायण राणे यांनी पत्रपरिषदेत सगळी पातळी सोडून शिवराळ पद्धतीने उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका केली आणि गरळ ओकली तर शेलार यांनी दुसरी पत्रपरिषद घेऊन ठाकरे यांच्या भाषणावर टीकास्त्र सोडले खरे मात्र, ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यावर उदाहरणासह निर्माण केलेल्या प्रश्नांचे खंडन या नेत्यांना करता आले नाहीच! उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सत्ताकारणाची वस्त्रे वेशीला टांगून आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला अद्दल घडवणारच, हे ठणकावून सांगितले. शिवाय सेनेने हिंदुत्व सोडलेले नाहीच, हे ही त्यांनी स्पष्ट केले. हा जसा भाजपला भीमटोला होता तसाच मित्रपक्षांनाही इशारा होताच! सत्ताकारण म्हणून आघाडी धर्माचे पालन आम्ही करतोय, ही स्पष्ट भूमिका उद्धव यांनी अधोरेखित करत शिवसैनिकांबरोबरच सर्वांचाच संभ्रम पूर्णपणे दूर केला. शिवाय जीएसटीचा मुद्दा उपस्थित करत आता भाजपशी सख्य तर नाहीच उलट भाजपला आव्हान देण्यात शिवसेना अग्रभागी असेल, असे स्पष्ट करून त्यांनी उघड बिगूल तर फुंकलेच पण मित्रपक्षांच्या मनातल्या शंकाही स्पष्टपणे दूर केल्या. एका अर्थाने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने स्वीकारलेल्या नव्या वाटेचा प्रवास कसा असेल? याचे स्पष्ट संकेतच दिले.

ओंगळवाणा चेहरा

त्यामुळे उद्धव ठाकरेंचा नवा अवतार सर्वांनाच दिसला आणि या अवताराने त्यांनी सर्वांनाच धुऊन टाकले. याच्या परिणामी राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय विरोधकांनाही मुद्यांवर राजकारण करण्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे. उद्धव यांच्या या नव्या अवताराने शिवसेना ख-या अर्थाने सीमोल्लंघन करून नवी राजकीय भूमिका अंगीकारणार व तीही आपली नैसर्गिक आक्रमकता न सोडता, हे स्पष्ट झाले आहे, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...