20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home संपादकीय शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

एकमत ऑनलाईन

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून टाकला. उद्योगधंद्यांची, व्यापार-उदिमाची, नोक-यांची, व्यवसायांची, शिक्षणाची म्हणजेच एकंदर अर्थचक्राचीच वाट या आरोग्य संकटाने लावून टाकली. मागच्या सहा महिन्यांपासून या कोरोनाने मानवजातीला अक्षरश: हतबल करून टाकले. या साथीत जीव गमवाव्या लागलेल्यांचे दु:ख तर डोंगराएवढेच! मात्र, या आरोग्य संकटाचा सामना करत, जिवावर उदार होऊन लढत, जगणे वाचविण्यासाठी धडपडणा-या लाखो-करोडो जिवांवर कोरोनासोबतच कोसळलेले अर्थसंकटही तेवढेच भीषण! या संकटाच्या तडाख्यातून देशातील एकही सर्वसामान्य माणूस वाचलेला नाहीच! कोरोना काळात देशाचा आधार म्हणून ज्या कृषी क्षेत्राकडे डोळे लागले होते त्यावरही कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनची वक्रदृष्टी पडलीच!

शेतात फळे, भाजीपाला चांगला येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारपेठाच बंद राहिल्याने हे कृषि उत्पादन शेतातच सडले. त्याकडे हताशपणे पाहण्याशिवाय बळिराजाकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही. शेतक-यांनी रस्त्यावर उभे राहून, गल्लोगल्ली जाऊन फळे, भाज्या विकण्याचा प्रयत्न केला पण ती निव्वळ केविलवाणी धडपडच ठरली! सरकार, प्रशासन नामक यंत्रणा त्यावेळी कोरोना संकटाने स्वत:च एवढी भेदरलेली होती की, त्यांना शेतक-यांच्या नुकसानीकडे पहायलाच उसंत नव्हती. मग ते बळिराजाला दिलासा तो काय देणार? असो! अचानक व अनाकलनीय संकट कोसळल्यावर मानवी मती गुंग होणे साहजिकच व ते समजूनही घ्यायला हवे! राज्यातील शेतकरी तेवढा सोशिकही आहे व समजदारही.

त्यामुळे लॉकडाऊनच्या मात्रेने झालेल्या नुकसानीची भरपाई बळिराजाने मागितली नाही की, त्याबाबत आक्रोशही केला नाही. बळिराजा कायम डोळ्यांत भविष्याचे स्वप्न घेऊन जगतो व काळ्या मातीत राबराब राबून ते स्वप्न पेरतो, फुलवतो, जोपासतो, जपतो! त्यामुळे मान्सून वेळेवर आल्याच्या आनंदात तो पेरणीच्या कामात व्यस्त झाला व लॉकडाऊनने केलेले त्याचे नुकसान त्याने मनातून काढून टाकले. त्यात पेरणीतही बोगस बियाणाने झालेली फसवणूक व नुकसान त्याने भविष्याच्या स्वप्न पेरणीत सोसवत नसतानाही सोसले! मात्र, त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ठ काही संपलेच नाही. शिवार फुलले, हिरवेगार झाले पण सोयाबीनला नेहमीप्रमाणे शेंगा लागल्याच नाहीत. हे दु:ख पचवण्याचा तो प्रयत्न करतोय तोवर संततधार पावसाचे संकट आले आणि शेतातले उभे पीक पाण्यात बुडून तेथेच कुजून जाण्याची स्थिती निर्माण झाली. त्यातून हाताशी आलेला उरलासुरला घास वाचवण्यासाठी बळिराजा धडपडत असताना आता राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने झोडपून काढले!

नियोजनाचा ‘अंधार’

नदी-नाल्यांना प्रचंड पूर आल्याने शेतातले सगळे पीक तर गेलेच पण नदीकाठच्या शेतक-यांच्या जमिनीतील मातीही वाहून गेली. पुराच्या पाण्याने जमिनीच खरवडून नेल्या नाहीत तर शेतातील पाईपलाईन, विद्युत मोटारीही गडप केल्या. पुराने प्रचंड माती येऊन विहिरी बुजून गेल्या! आभाळच फाटले आता ठिगळ लावायचे तरी कुठे? अशीच स्थिती सध्या निर्माण झाल्याने आता मात्र भविष्याचे स्वप्न पेरणारा बळिराजा वर्तमानात पुरता उद्ध्वस्त झालाय, खचून गेलाय! संकटाच्या या मालिकेने त्याला अक्षरश: रस्त्यावर आणलेय ! हा धक्का पचवू न शकलेल्या तीन शेतक-यांनी तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारून आपली जीवनयात्राच संपवली! या बळिराजाला वाचवण्यासाठी, जगवण्यासाठी सध्या त्याला तातडीने मदतीचा हात देण्याची, सावरण्याची गरज आहे. झालेले नुकसान प्रचंड आहे. अनेकांची शेतीच उद्ध्वस्त झालीय! अशावेळी मायबाप सरकारच्या मदतीकडे बळिराजा डोळे लावून बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हे संकट लक्षात घेऊन या वयातही कोरोना संकटाचीही पर्वा न करता बांधावर जाऊन बळिराजाचे अश्रू पुसण्याचा व त्याला धीर देण्याचा निर्णय घेतला व ते मराठवाडा दौ-यावर आले. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे.

कारण त्यांनी स्वत: तर बळिराजाबाबत संवेदना दाखवलीच पण सरकार, प्रशासन आणि विरोधी पक्षाच्याही संवेदना जाग्या केल्या! त्यासाठी शरद पवार यांचे दुहेरी अभिनंदन करावे लागेल व आभारही मानावे लागतील! असो!! संकटात सापडलेल्या बळिराजाच्या बांधावर सरकारमधील नेते, त्यांच्यामागे प्रशासन व विरोधी पक्षाचे नेते पोहोचले, त्यांनी पाहणी केली, बळिराजाला धीर दिला, हे ही नसे थोडके! मात्र, या सगळ्याचे प्रत्यक्ष फळ पदरात पडून कोलमडून पडलेल्या बळिराजाला तातडीने आधार मिळेल का? ही शंका मात्र कायमच आहे. कारण सरकारने अद्याप कुठलाही मदतीचा निर्णय जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यामागे अद्याप अतिवृष्टीचे संकट कायम असल्याचे कारण दिले ते एका बाजूने खरेही आहे. हवामान खात्याने परतीचा पाऊस आणखी किमान आठवडाभरात तरी मुक्काम हलविणार नाही व जोरदार बरसणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या जे नुकसान झालेय त्यात आणखी मोठी भर पडू शकते. त्यामुळे घाईघाईत मदत जाहीर करता येणार नाही, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका रास्तच.

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

मात्र, सध्याच बळिराजा एवढा उद्ध्वस्त झालाय की, त्याला तातडीची मदत मिळाल्याशिवाय तो टिकणारच नाही, हे वास्तवही सरकारने लक्षात घेऊन तातडीने कार्यान्वित व्हायला हवे. ‘सरकारी काम सहा महिने थांब’, हा खाक्या यावेळी चालू शकत नाही कारण बळिराजाची सहनशक्ती पुरती संपलीय! सरकारी पंचनामे, अहवाल, कागदी कार्यवाही या नेहमीच्या पद्धतीनेच मदत मिळणार असेल तर त्यासाठी जो वेळ लागतो तोवर उद्ध्वस्त बळिराजा तग धरू शकत नाही, हे यावेळी लक्षात घ्यायला हवे. शिवाय मदत केंद्राने द्यावी की राज्याने? हे राजकीय वाद रंगविण्याचीही ही वेळ नाही व परिस्थिती नाहीच! केंद्र असो की राज्य, सत्ताधारी असो की विरोधक, बळिराजा वाचला पाहिजे, तरला पाहिजे हेच या घडीचे सर्वोच्च प्राधान्य आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतक-याच्या बांधावर आलेल्या सत्ताधारी व विरोधकांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जी अतिवृष्टी केली ती पाहता त्यांना बळिराजाच्या व्यथांपेक्षा पक्षीय राजकारणाचीच चिंता जास्त आहे, असेच म्हणण्याची पाळी दुर्दैवी शेतक-यांवर आली.

शरद पवार यांनी तुळजापूरच्या पत्रकार परिषदेत अतिशय संवेदनशील व योग्य भूमिका मांडली. नुकसान प्रचंड मोठे आहे. अशावेळी निकष, नियम याच्यात अडकून न पडता मदतीचा हात द्यावा लागेल. त्यासाठीचा पैसाही तसाच विविध प्रयत्नांनी उभा करावा लागेल. केंद्राने मदत दिलीच पाहिजे पण कोलमडून पडलेल्या शेतक-यांना व शेतीला उभे करायचे तर प्रसंगी राज्यानेही कर्ज काढून हे केले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली. एवढेच नाही तर त्यासाठी प्रयत्नही करणार असल्याचे सांगितले. संकटात सापडलेल्या बळिराजाला जगविण्यासाठी सध्या याच भूमिकेची व प्रयत्नांची तातडीची गरज आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनीही शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता काय सांगतोय हे लक्षात घेऊन पक्षीय राजकारणाची उबळ दाबावी, हीच अपेक्षा! संकटातील शेतक-यांच्या डोळ्यातील अश्रूंचे, दु:खाचे हसू पक्षीय राजकारणाने होणार नाही, याची सर्वच राजकीय नेत्यांनी दक्षता घ्यावी व एकत्रितरीत्या बळिराजाला आधार देऊन जगवावे, हीच किमान अपेक्षा!

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

लस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज

जिनिव्हा : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीकडे लागले आहे. मात्र, या लसीच्या...

आता ‘पीयूसी’ नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त होणार

नवी दिल्ली : देशभरातील वाहनांना पल्यूशन अंडर कंट्रोल(पीयूसी) प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले असून, आगामी १ जानेवारी २०२१ पासून वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर...

शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

पाराओ : दिल्ली चलो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपसरकारकडून चालू आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांकडूनच पाण्याचे फवारे, अश्रुधर सोडण्यात आले. मात्र त्याला...

जेव्हा तिकीट हवे असते, तेव्हाच जात आठवते

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन टीका केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये जात...

धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ पुरस्कार

सिंधुदुर्ग : आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाचा मानला जाणारा वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट, पुरस्कारासाठी मालवण तालुक्यातील धामापूर गावात असलेला पाण्याचा मुख्य जलस्रोत धामापूर तलावाची निवड...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...