25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसंपादकीयसंपादकीय : यम हवा की संयम?

संपादकीय : यम हवा की संयम?

एकमत ऑनलाईन

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज झपाट्याने वाढत आहे़ गत २४ तासांत देशात सुमारे ४८ हजार नवे रुग्ण आढळून आले, साडेसहाशे रुग्णांचा मृत्यू झाला़ या वाढीमुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्या आसपास पोहोचला आहे़ सुमारे ३३ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे़ तसेच सुमारे साडेनऊ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ इतर देशांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असूनही भारतातील कोरोना संसर्गाची परिस्थिती चांगली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांनी म्हटले आहे़ महाराष्ट्रातही कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़ ते मार्गी लावण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.

राज्यात चार दिवस नऊ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यानंतर गत २४ तासांत रुग्णवाढीत अंशत: घसरण झाल्याचे आढळून आले़ राज्यात सोमवारी ७,९२४ नवे रुग्ण आढळून आले़ याच काळात सुमारे ८,७०० रुग्ण बरे होऊन घरी परतले़ देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले़ महाराष्ट्रात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना कोरोना योद्धे असे संबोधले जात आहे़ गत २४ तासांत पोलिस दलातील १३८ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली़ त्यामुळे पोलिस दलातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८,७२२ वर पोहोचली़ आतापर्यंत मृतांची संख्या ९७ वर गेली आहे़ पोलिस दलात १,९५५ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत़ आजवर ६,६७० पोलिसांनी या जीवघेण्या विषाणूवर यशस्वी मात केली आहे.

‘राष्ट्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असणा-या पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आली आहे़ कोरोना रुग्णवाढीचा, मृत्यूचा आणि बरे होणा-यांचा आकडा सरासरीनुसार पाहिल्यास महाराष्ट्र कोरोनावर मात करण्याच्या वाटेवर असल्याचा दिलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे़ इतरांना धडा घालून देण्यात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर असते़ देशात महाराष्ट्र राज्य सर्वांगीण विकासात नेहमीच सरस राहिले आहे़ त्यामुळेच राज्याला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जाते़ त्यामुळे आता अर्थचक्राला गती देताना काही धाडसी निर्णय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

कोरोनाबाबत राज्यातील जनता देखील सजग झाली आहे हे लक्षात घेऊन सरकारने जनतेवरही विश्वास ठेवला पाहिजे.सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा आणि धोरण अधिकार केंद्र सरकारकडे होते़ त्यामुळे साथनियंत्रणाबाबतचे निर्णय घेण्यात राज्य सरकारचे हात बांधले गेले होते़ २२ मार्चपर्यंत दिल्ली दंगल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारतभेट आणि इतर राज्यांतील राजकारण यामुळे कोविड साथीवर काहीही हालचाल झाली नव्हती. त्यावेळी केंद्र सरकारला साथीचे गांभीर्यच समजले नव्हते. व्हेंटिलेटर्स, चाचणी संच आदी साहित्य राज्यांनी करू नये, पैसाही राज्यांना दिला जाईल असे फर्मान काढण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीत राज्यात अनेक कोविड रुग्णालये तयार झाली, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कार्यरत झाले.

Read More  फेवीपिरावीर बाजारात लॉन्च : किंमत प्रति गोळी 59 रुपये

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री नियमितपणे लोकांना माहिती, धीर देत होते. प्रशासनावर अवलंबून राहिल्याने निर्णय आणि अंमलबजावणीत दिरंगाई झाली, अनेकांची गैरसोय झाली, त्रासही झाला़ पण तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली़ आता मात्र आर्थिक व्यवहाराला गती दिली पाहिजे, उद्योग, व्यापार सुरू होणे गरजेचे आहे़ सामान्य नागरिकांपासून सरकारपर्यंत सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली असली तरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे कसे उभे राहू याचा सकारात्मक विचार झाला पाहिजे़ नोकरदार, लघु-मध्यम उद्योजकांना मदतीचा हात कसा देता येईल हे पाहिले पाहिजे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उभारी दिली पाहिजे़ आजवरच्या सहा दशकांत महाराष्ट्राने जी काही प्रगती केली आहे ती स्वत:च्या ताकदीवऱ तेव्हा राज्य सरकारने केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही.

कोरोना संकटकाळात बँक कर्मचा-यांनी जोखीम पत्करून ग्राहकसेवा दिली आहे हे विसरून चालणार नाही़ नोटाबंदीच्या काळातही या कर्मचा-यांनी चांगले काम केले होते़ परंतु ‘मन की बात’मध्ये बँक कर्मचा-यांचा साधा उल्लेखही झाला नाही.अत्यावश्यक सेवांतील कर्मचा-यांचा ‘कोविड योद्धे’ म्हणून जसा गौरव झाला तसा गौरव बँक कर्मचा-यांचाही झाला पाहिजे़ असो़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून असतात़ त्यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा केला पाहिजे अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यासंबंधात मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, ते कर्णधार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व माहिती एकत्रपणे घेऊन तातडीने निर्णय घेणे सोपे जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेणेच योग्य आहे.

कर्णधाराने फिरण्यापेक्षा काम नीट होते की नाही हे पहायचे असते़ विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला ‘यम’ हवा की ‘संयम’? माझ्यात आत्मविश्वास आहे, जे काम हाती घेतलंय ते मी पूर्ण करणारच! अक्षराअक्षराने जुळून शब्द बनतो़ त्या शब्दाचे मंत्र होतात़ शब्दांची ओवी होते आणि शिवीसुद्धा होते़ उदाहरणार्थ ‘संयम’ शब्द़ त्यातला ‘स’ काढला तर काय होईल? त्यामुळे संयम हवा की यम हे तुम्हीच ठरवा़ आपल्या नेतृत्वाखाली काम सकारात्मक चालले आहे़ राज्याला ऊर्जा मिळतेय.

Read More  दहावीत एकाच वेळी माय लेकराचे यश संपादन

या सा-या गोष्टी लोकांनी स्वीकारल्या आहेत़ महाविकास आघाडी सरकारचे भविष्य विरोधी पक्षाच्या हातात नाही अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारली़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार तीन चाकी आॅटोरिक्षासारखे आहे़ कुठे जायचे ते चालक ठरवत नसतो तर मागे बसलेले दोन प्रवासी ठरवतात.. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती़ त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझे सरकार रिक्षासारखे आहे हे खरे आहे पण ते गरिबांचे वाहन आहे़ बुलेट ट्रेन की रिक्षा? यात मी रिक्षाच निवडेन! मी गरिबांच्या मागे उभा राहीन!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या