22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeसंपादकीयआटापिटा लसीच्या यशासाठी

आटापिटा लसीच्या यशासाठी

एकमत ऑनलाईन

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल तेच पाहिले आहे. कोरोनाविरुद्ध परिणामकारक लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, वैज्ञानिक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांना हुरूप देण्याऐवजी डब्ल्यूएचओ म्हणते २०२० वर्ष अखेरपर्यंत तर लस येणारच नाही, कदाचित २०२१ च्या मध्यापर्यंत ती येऊ शकेल परंतु तोपर्यंत २० लाख लोकांचे बळी जातील. याचाच अर्थ असा की ही संघटना लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मनात धडकी भरवण्याचेच काम करीत आहे.

भारतासह जगभरातील देश कोरोना विषाणू संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक देशांनी कोरोना विषाणू नियंत्रणात ठेवणारी लस निर्माण केल्याचा दावा केला आहे. तर काही ठिकाणी चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. अशा स्थितीत भारतातही लसनिर्मिती झाली अथवा इतर देशांकडून लस मागवली तर देशातील कोरोना विषाणू संसर्ग लगेच संपुष्टात येईल काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या भीषण संकटाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण मानवजातीला मदत करण्यासाठी भारत आपल्या उत्पादन आणि वितरण क्षमतेचा वापर करेल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.

गत ८-९ महिन्यांपासून सारे जग कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहे. कोरोनाविरुद्धच्या संयुक्त लढ्यात संयुक्त राष्ट्र कुठे आहे? असा थेट सवाल त्यांनी केला. या महासाथीच्या अत्यंत कठीण काळातही भारताच्या औषध निर्माण उद्योगाने जगातील दीडशेहून अधिक देशांना आवश्यक औषधे पाठवली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना मोदी यांनी जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणि लोकसंख्या असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणा-या संरचनेतून किती दिवस बाहेर ठेवले जाणार आहे असा जहरी सवाल केला. भारताला सतत डावलले जात आहे अशी खंत व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांचे स्थैर्य आणि सशक्तीकरण हे जगाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे असे मोदी म्हणाले.

सोलापूर शहर जिल्ह्यात १४ जणांचा कोरानाने मृत्यू

असो. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना लस उपलब्ध झाली तर कोरोना विषाणू संसर्ग लगेच नाहीसा होईल काय? या प्रश्नाला आशावादी लोक ‘होय’ असे उत्तर देतील तर वास्तववादी लोक ‘नाही’ असे उत्तर देतील. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पुढील वर्षापर्यंत ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत का? असा सवाल सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला लस द्यायची असेल तर त्यासाठी ८० हजार कोटींची गरज आहे. केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची तयारी आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्याप्रमाणे देशातील आणि परदेशातील लस उत्पादकांना खरेदी आणि वितरण याबाबतच्या सूचना द्याव्या लागतील.

ऑक्सफर्ड विद्यापीठ, अ‍ॅस्ट्राझेन्का आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील सामंजस्य करारातून कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे. या लसीची दुस-या टप्प्यातील मानवी चाचणी २६ ऑगस्टपासून पुण्यात सुरू आहे. २१ सप्टेंबरपासून तिस-या टप्प्याची मानवी चाचणी प्रक्रियाही सुरू झाली आहे. तिस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आल्यास ही लस २०२१ च्या पूर्वार्धात बाजारात उपलब्ध होऊ शकेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात कोरोना विषाणू संसर्गाची व्याप्ती पाहता ग्रामीण भागापर्यंत लस पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. कारण सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारतातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कोरोना प्रतिबंधक लस पोहोचवणारी साखळी उभी करावी लागेल. एवढेच नव्हे तर लस साठवणुकीचेही मोठे आव्हान आहे. लस पुरवठा, लस वहन करताना अधिक खबरदारी घ्यावी लागेल. लसीची साठेबाजी होणार नाही हेही पहावे लागेल. त्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग महत्त्वाचे आहे.

इलेक्ट्रॉनिक वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क उभारावे लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासंबंधीचे निश्चित धोरण आखल्याचे म्हटले आहे. इंटरनेट आधारित डिजिटल प्रणाली नियमित लसीकरण, लसीचा साठा या संदर्भात सुमारे २५ हजार लस साठवणूक केंद्रांवर लक्ष ठेवेल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, २०२१ च्या सुरुवातीला लस उपलब्ध होईल अशी आशा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ समिती देशातील सर्व नागरिकांना तळागाळापर्यंत लस पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करेल. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, लसनिर्मितीची सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्व चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्या की लगेच लसनिर्मिती करून ती वितरीत केली जाईल.

नागपूरची अवस्था मुंबई-पुण्यासारखी होईल : आमदार कृष्णा खोपडे

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, सर्वांपर्यंत लस पोहोचविण्यात येईल मात्र त्यासाठी काही टप्पे करण्यात येतील, प्रथम ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येईल. तज्ज्ञांच्या मते २०२० वर्षअखेर भारत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास सक्षम होऊ शकेल. तोपर्यंत उद्योजक, नेत्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना व्हायरस लसीकरणाबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असले तरी ती एक प्रक्रिया आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा आवाका पाहता हे लसीकरण कमी कालावधीत पार पाडणे अशक्य आहे. कोरोना विषाणूशी संपूर्ण जग लढत आहे. अशा अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंग्लंडमध्ये अशी परिस्थिती उद्भवली आहे. कोव्हिशिल्ड लस यशस्वी ठरली तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. मात्र जर कोव्हिशिल्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ कोटीचा विमा नुकसानभरपाईच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या जिवावर उदार होऊन मानवजातीच्या कल्याणासाठी तयार झालेल्या स्वयंसेवकाचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. पुण्यानंतर आता मुंबईमध्येही लस चाचणी केली जाणार आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत ३७५ स्वयंसेवकांनी नोंद केली आहे. त्यातील प्रकृती ठणठणीत असलेल्या १०० स्वयंसेवकांची निवड करण्यात येईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या