17.5 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home संपादकीय दादागिरी नही चलेगी!

दादागिरी नही चलेगी!

एकमत ऑनलाईन

मोदी सरकारने संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधकांच्या विस्कळीतपणाचा योग्य वापर करीत कृषी सुधारणासंबंधीची तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेतली असली तरी विधेयके मंजूर होण्याच्या घटनाक्रमाने जी ठिणगी पडली आहे ती पाहता मोदी सरकारला या यशाचा आनंद साजरा करता येणे अवघडच बनले आहे. एकीकडे ज्या शेतक-यांच्या हितासाठी व उद्धारासाठी ही विधेयके आणल्याचा दावा सरकार करते आहे त्याच शेतक-यांना सरकारच्या हेतूबद्दल व ‘कथनी व करणी’ बाबतच शंका असल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. या शेतक-यांचा विश्वास प्राप्त करण्यात सरकारला अपयश आले आहे.

सरकार भलेही विरोधकांवर गैरसमज पसरविल्याचा आरोप करीत असले तरी गैरसमज निर्माण झाल्याची ती अप्रत्यक्ष कबुलीच आहे तर दुसरीकडे सरकार विरोधकांना या घटनाक्रमाने ‘आयते कोलित’च मिळाले आहे. सरकारकडे सध्या मोठे संख्याबळ असल्याने कदाचित केंद्रात मोदी सरकार त्याची फारशी चिंताही करणार नाही. मात्र, ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत तेथे भाजपसाठी कृषी विधेयके ‘अंगलट’ येण्याचीच स्थिती आहे. तेथे भाजपची स्थिती ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशीच होण्याची चिन्हे दिसतायत. कदाचित निवडणूक मॅनेजमेंटमध्ये मास्टरी प्राप्त असलेली मोदी-शहा अजेय जोडी त्यावर उतारा शोधून काढेलही मात्र, तिसरीकडे जो राजकीय घटनाक्रम घडलाय तो भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी जास्त चिंतेचा व या आघाडीचा मजबूत पाया खिळखिळा होण्यास कारणीभूत ठरणारा असू शकतो व तो म्हणजे भाजपचा सर्वांत जुना व कायमचा मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने उघडपणे व्यक्त केलेली नाराजी.

कृषी विधेयकांवर रालोआमध्ये एकमत होऊन ते संसदेत आणले गेले नाही. यावर आता या पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिक्कामोर्तब झाले आहे. शिरोमणी अकाली दलाने अद्याप रालोआतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पंजाबातील शेतक-यांचा वाढता संताप व उद्रेक पाहता शिरोमणी अकाली दल आपल्या मतदारांसोबत जाणार हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यकाराची गरज नाहीच! त्यामुळे या घोषणेच्या औपचारिक पूर्ततेचे ‘टायमिंग’ काय? हाच काय तो उत्सुकतेचा मुद्दा! भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का ठरणार आहे. कारण ज्या वेळी भारतीय राजकारणात हिंदुत्ववादी भाजप इतर सर्व राजकीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या ‘अस्पृश्य’ होता त्या वेळी या पक्षासोबत दोन मित्रपक्ष अत्यंत ठामपणे उभे होते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व प्रकाशसिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दल! या मित्रांच्या साथीनेच भाजपने आपला प्रवास सुरू ठेवत स्वत:चा परीघ वाढविला आणि सत्तेचा सोपान गाठला.

भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

मात्र, सत्ता..प्राप्तीनंतर मोदी-शहांच्या प्रभावाखाली असलेल्या सध्याच्या भाजपला ‘ग’ची बाधा झाली आहे. त्यातून आपल्या सख्ख्या मित्रांचेही पंख छाटण्याचा उद्योग या जोडीने बिनदिक्कतपणे चालविला आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत आव्हाने संपुष्टात आणून या जोडीने पक्षावर आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केलेले असल्याने त्यांच्या वर्तनाला भाजपात चाप लावणारे कुणीही शिल्लकच नाही. त्यामुळे या जोडीचा वारू चौखूर उधळला आहे. त्यात दुस-या टर्ममध्ये पक्षाला स्वबळावर बहुमत प्राप्त झाल्याने ही अजेय जोडी केवळ विरोधकांनाच नव्हे तर आपल्यासोबत आघाडीत असलेल्या मित्रांनाही कस्पटासमान वागणूक देते आहे. भाजपच्या या वाढत्या दादागिरीचा पहिला फटका शिवसेनेला बसला. पहिल्या टर्ममध्ये भाजपने केंद्रात व राज्यातही शिवसेनेला अक्षरश: आपल्यामागे फरफटत नेले. महाराष्ट्रात शिवसेनेने सर्वप्रथम भाजपची दादागिरी सोसण्यास नकार देत वेगळी वाट धरली आणि भाजपला जोरदार धक्का दिला. मात्र, तरीही भाजपची ही अजेय जोडी भानावर आलेलीच नाही.

पंजाबमध्ये भाजप शिरोमणी अकाली दलाच्या ताकदीवरच जिवंत आहे. मग आपल्या मित्राला अडचणीचे ठरणारे निर्णय रेटून नेण्याची दादागिरी का? हाच अकाली दलाच्या असंतोषाचा मुद्दा आहे. योग्य समन्वय, संवाद व चर्चा या विश्वास संपादन करण्याच्या मार्गाने भाजपला या तिढ्यावर मार्ग नक्कीच काढता आला असता. मात्र, ‘ग’ ची बाधा झालेल्या अजेय-जोडीला याची गरजच वाटत नाही. ‘हम करे सो कायदा’ हीच भाजपची सध्याची कार्यपद्धती व प्रवृत्ती! यामुळे भाजप विरोधकांशी तर संवाद साधण्याचा विचारही करीत नाहीच मात्र, मित्रांना, सत्तेत भागीदार असणा-यांनाही विश्वासात घेण्याची गरज भाजपला वाटत नाही. त्यातूनच रालोआत असंतोषाची ठिणगी पडलीय! आधी चंद्राबाबू, मग उद्धव ठाकरे आणि आता बादल यांनी पुकारलेले बंड हा अजेय जोडीला झालेल्या ‘ग’च्या बाधेचा व त्यातून निर्माण झालेल्या दादागिरीच्या कार्यपद्धतीचा परिपाक! अर्थात हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याने किंवा उद्या अकाली दलाने रालोआतून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा केल्याने मोदी सरकारच्या स्थैर्यावर काहीही परिणाम होणार नाही, हे सत्यच!

जड झाले ‘ओझे’…

मात्र रालोआच्या भक्कम पायाला तडे नक्कीच गेले आहेत. दोन जुन्या मित्रांनी भाजपच्या अजेय जोडीविरुद्ध ‘दादागिरी नही चलेगी’चा नारा बुलंद केला आहे. त्याचा परिणाम आजवर मोदी वलयाच्या ओझ्याखाली दबून मुकाट हे ओझे गोड मानून घेणा-या इतर अनेक लहान-सहान पक्षांवर होणार व त्यांचा स्वाभिमान जागा होणार, हे नक्की! स्वत:चे वलय असणा-या नितीशकुमार, बिजू जनता दल या पक्षांनी तर या अगोदरच भाजपला केवळ धक्काच दिलेला नाही तर धडा शिकविला आहे. त्यामुळेच भाजपने बिहारमध्ये निमूटपणे नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य करीत पडती बाजू घेतली आहे. रामविलास पासवान त्यामुळे भाजपवर नाराज आहेत व त्यांचे पुत्र चिराग पासवान राज्यातील निवडणुकीत वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत. आघाडीच्या राजकारणात आपले बळ वाढले की, मित्रपक्षांना दुय्यम स्थानी लोटण्यास सुरुवात होते. हे राजकारणातील सत्य! २००९ मध्ये काँग्रेसला दोनशेपेक्षा जास्त जागांवर विजय मिळाल्यावरही हे घडले होतेच. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने ‘ग’ची बाधा करून न घेतल्याने संपुआत धूसफूस झाली तरी विस्फोट झाला नव्हता! आता रालोआत मात्र भाजपच्या अजेय जोडीला ‘ग’ च्या बाधेने पुरते ग्रासल्याने मित्रपक्षांच्या असंतोषाचे भडके उडतायत व विस्फोट होतायत. त्यातूनच मुद्दा कुठलाही असला तरी ‘दादागिरी नही चलेगी’चा नारा बुलंद होतोय, हाच काय तो या घटनाक्रमाचा अन्वयार्थ!

ताज्या बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...