17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय गरज सरो...!

गरज सरो…!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात भाजपचा शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष हा तोंडवळा बदलून जनसामान्यांपर्यंत पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी खस्ता खाऊन पक्षाला जनाधार मिळवून देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मागच्या चार वर्षांपासून कुरकुरत व भांडत सुरू असलेला संसार अखेर मोडित काढण्याचा निर्णय घेतला. हा काडीमोड धक्कादायक, अनपेक्षित वगैरे अजिबात नव्हताच! उलट मागच्या चार वर्षांत खडसेंचे पंख इतक्या पद्धतशीरपणे कापणे सुरू होते की, हा ‘परफेक्ट गेम’ होणे अटळच होते! फक्त हा ‘गेम’ झाल्यावर नाथाभाऊ आपले उपद्रवमूल्य कसे व किती प्रमाणात दाखवू शकतात? त्यासाठी कोणती राजकीय खेळी करू शकतात? हेच काय ते उत्सुकतेचे प्रश्न होते. त्यामुळे नाथाभाऊंनी भाजपला ‘रामराम’केला ही उत्सुकतेची बातमी नव्हतीच कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आपल्या यादीतून केव्हाच ‘डिलीट’ करून टाकले होते. बातमी आहे ती नाथाभाऊंनी मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्याची!

सर्वांत जास्त आमदार असतानाही शिवसेनेसोबतचा घरोबा टिकवण्यात लवचिकता न दाखविल्याने सत्तेचे ताट हिसकावले गेल्याने प्रचंड अस्वस्थ असलेल्या व महाआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपसाठी नाथाभाऊसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागणे ही राजकीय अडचण निर्माण करणारी खेळी आहे. कारण राष्ट्रवादीने भाजपच्या सरकार अडचणीत आणण्याच्या खेळीला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपलाच ‘बॅकफूटवर’ जाण्याची वेळ आणलीय! निवडणुकीपूर्वी महा इनकमिंगचे सोहळे रंगवणा-या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने दिलेला हा ‘चेकमेट’ आहे. फडणवीस यांना सरकार पाडण्याची स्वप्ने पाहणे सोडून आता आपले घर वाचविण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाथाभाऊंना राष्ट्रवादीचे दरवाजे उघडताना ही रणनीती आखलेली असणार हे उघड आहे.

पवारांच्या या खेळीचा सामना भाजप कशा पद्धतीने करणार? हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे आणि म्हणूनच ऐन कोरोना काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बाकी नाथाभाऊंच्या सीमोल्लंघनाने भाजपचे किती नुकसान होईल? राष्ट्रवादीचा कितपत फायदा होईल? राष्ट्रवादीत पक्षांतर्गत समतोलाचे समीकरण कसे राहील? खडसेंसोबत किती जण भाजप सोडतील? राष्ट्रवादीचा खानदेशात पाया भक्कम होईल का? ओबीसी कार्डाचा राष्ट्रवादीला फायदा व भाजपला तोटा होईल का? वगैरे वगैरे सर्व उपचर्चा सध्या ज्या प्रमुख चर्चा असल्याप्रमाणे चर्चिल्या जात आहेत त्याला आता फारसा काही अर्थ रहात नाही. नाथाभाऊंना पक्षातून साईडलाईन करण्याचा प्रयत्न सुरू झाल्यावर व त्यावरून नाथाभाऊंनी संधी मिळेल तेथे आक्रमक होऊन आपली खदखद व्यक्त केल्यावरही केंद्रीय नेतृत्वाने त्याकडे अजिबात लक्ष न देता फडणवीसांच्या नेतृत्वालाच बळ देण्याचा जो निर्णय घेतला तो न विचार करताच घेतला, असे स्वत:च गृहीत धरून चर्चा केली, आडाखे बांधले तरच यावरील उपचर्चा प्रमुख मुद्दे आहेत, हे मानण्याचे धारिष्ट्य आपण करू शकतो.

कोरोना संसर्गाचा विळखा सैल

वास्तव हेच की, अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा आता नाथाभाऊ यांना विचार न करता, परिणामांचा अभ्यास न करता दूर केले गेलेले नसते. तसा समज आपण करून घेणे ही आपली राजकीय अपरिपक्वता व राजकारणाची गती, आकलन कमी असण्याचेच लक्षण! असो!! हल्ली अशा लक्षणांचाच समावेश असणा-या ‘सो कॉल्ड’ राजकीय तज्ज्ञांची मांदियाळी इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांपासून समाज माध्यमांपर्यंत असल्याने अशा उपचर्चाच मुख्य चर्चा म्हणून चघळल्या जाणे साहजिकच! मूळ मुद्दा हा की, भाजपने व्यवस्थित विचार करूनच राज्यातल्या आपल्या या बड्या नेत्याचे पंख कापले आहेत. भाजपने असे का केले? हा खरा मूळ मुद्दा आणि त्यावरच मुख्य चर्चा झाली तरच नाथाभाऊंच्या सीमोल्लंघनाने बदलणा-या राज्यातील राजकीय समीकरणांचे आकलन करता येईल! त्याची सुरुवात मोदी-शहा या जोडीच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयापासून होते.

वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील समता-ममता ते जयललिता यांच्या समावेशाच्या रालोआच्या सत्ताकाळातील आघाडीच्या ब-या-वाईट अनुभवांचा अभ्यास करतानाच विरोधकांची शक्तिस्थाने व कच्च्या दुव्यांचाही अभ्यास करत मोदी-शहांनी आपली एक रणनीती निश्चित केली आहे. त्याचा पहिला भाग म्हणजे काँगे्रसच्या पारंपरिक राजकारणाला छेद देऊन स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी नव्या चेह-यांना प्राधान्य द्यायचे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इतर कुठल्याही राजकीय समीकरणांपेक्षा सत्ताकारणाचे समीकरण सर्वांत जास्त महत्त्वाचे! या सत्ताकारणाच्या समीकरणाचे प्रमुख निकष म्हणजे एखाद्याची उपयुक्तता किती? हे सर्वांत महत्त्वाचे! त्याच्या उपयुक्ततेइतकेच पक्षाकडून त्याला मिळेल! ना कमी, ना जास्त! शिवाय ज्याची उपयुक्तता संपली त्याचा सत्ताकारणातला वाटाही संपला, हाच नियम!

मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे हे रूप नाथाभाऊंसारख्या मुरब्बी राजकारण्यास कळले नसेल, असे मानणे चूकच! मात्र, हे कळूनही नाथाभाऊंनी ते वळवून घेतले नाही किंवा पचवले नाही. उलट ते आपल्या ज्येष्ठतेचेच ढोल वाजवत राहिले व पक्षावर आपला मालकी हक्क सांगत राहिले. ज्या पक्षाचे नेतृत्व केले त्याच पक्षात त्या व्यक्तीने स्वत:वर अन्याय होत असल्याचे रडगाणे गात राहणे, याचाच अर्थ त्याची सत्ताकारणातील उपयोगिता संपुष्टात येणे हाच आहे! नाथाभाऊंचे चार वर्षांच्या आदळआपटीनंतर जे सीमोल्लंघन घडले त्याचा एकच अन्वयार्थ आणि तो म्हणजे मोदी-शहांच्या भाजपचे ‘गरज सरो, वैद्य मरो’, हे सूत्र! मोदी-शहा सध्यातरी या सूत्रावर ठाम आहेत व स्वत:च्या ताकदीबाबत ‘आत्मनिर्भर’ आहेत.

कोरोना काळातही ८७ वर्षांच्या योध्द्या डॉक्टरची अनवाणी सेवा

त्यामुळे रालोआतील अकाली दल, शिवसेना या जुन्या मित्रांनी साथ सोडली तरी भाजपला फरक पडलेलाच नाही! तेच सूत्र पक्षांतर्गत ज्येष्ठांना बाजूला करतानाही लागू झाले! नाथाभाऊंचे सीमोल्लंघन ही भाजपसाठी सध्या तरी या सूत्राची परिणिती आहे. मात्र, भाजपच्या या सत्ताकारणाच्या सूत्राला धक्का देऊन त्यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न भंगवणारे शरद पवार खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा वापर अचूक करणार आणि राज्यात भाजपला बॅकफूटवर ढकलत स्वत:चे घर वाचविण्यासाठी प्रयत्न करायला लावणार, हे स्पष्ट आहे. आगामी काळात भाजपसाठी ही अडचण वाढणार आहे आणि कदाचित खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश ही राज्यातील भाजपची आत्मनिर्भरता व विजयाच्या धुंदीचा आलेख उतरणीला लावणारी नांदी ठरू शकते! हे लक्षण भाजपसाठी धोक्याची घंटाच ठरणार, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...