17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय ना रहेगा गरीब, ना रहेगी गरिबी

ना रहेगा गरीब, ना रहेगी गरिबी

एकमत ऑनलाईन

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासह जागतिक पातळीवरच्या सर्व वित्तीय संस्था, संघटना, अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, अभ्यासक, विचारवंत वगैरे सर्व मंडळी कोरोना जागतिक महामारीने आरोग्याबरोबरच अर्थकारणालाही जो जबरदस्त फटका बसलाय त्याने जगातील गरिबांचे जीवन तर उद्ध्वस्त होणार आहेच पण लाखो-करोडो लोक दारिद्र्यरेषेखाली नव्याने लोटले जाणार आहेत, असा एकमुखी इशारा देत आहेत. कोरोना संकटाने अर्थचक्र ठप्प करून टाकले. लाखो-करोडो लोक बेरोजगार झाले. कोट्यवधी छोटे-मोठे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. या व्यवसायांवर उपजीविका असणा-यांचा जगण्याचाच मार्ग खुंटला. हातावर पोट असणा-यांना तर जगायचे कसे? हाच प्रश्न पडला. या सगळ्याच्या परिणामी जगातील उपासमार, गरिबी, कुपोषण दूर करण्याचे जे प्रयत्न केले जात होते त्यावर अत्यंत विपरीत परिणाम झाला. कोरोना संकटाबरोबरच हे भीषण संकट मानवजातीसमोर ‘आ’ वासून उभे आहे.

कोरोनाचे संकट आज ना उद्या संपले नाही तरी कमी होईल, उताराला लागेल, पण त्याने हातात हात घालून आणलेले हे दुसरे संकट मात्र जगासाठी दीर्घकाळ आव्हान बनूनच राहणार आहे. त्यामुळे या संकटाशी लढण्याची एकत्रित, दीर्घकालीन, ठोस व संवेदनशील योजना बनवून त्यावर गांभीर्याने काम करण्याची गरज आहे आणि ती ही युद्धपातळीवर! हाच इशारा कोरोना संकट आल्या दिवसापासून वरील सर्व संस्था, संघटना, व्यक्ती संपूर्ण जगाला देतायत! त्यातल्या त्यात विकसनशील व गरीब राष्ट्रांसाठी तर ही परिस्थिती सर्वांत गंभीर आणि धोकादायक बनणार आहे, हे तज्ज्ञांनी वारंवार बजावले आहे व ती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर गंभीर प्रयत्नांची गरजही अधोरेखित केली आहे. मात्र, प्रत्यक्षात काय घडतेय? तर त्याचे उत्तर ‘काहीच नाही’, हेच! राजकारणासाठी व सत्ताकारणासाठी पदोपदी गरिबी दूर करण्याच्या व गरिबांचे कल्याण करण्याच्या घोषणा करणारे देशोदेशीचे राजकीय नेतृत्व या इशा-यांबाबत मात्र, कानात शिसे ओतले असल्याप्रमाणे ढिम्म, निर्विकार आहे.

या संकटाचा सामना करण्यासाठी खडबडून जागे होणे, कार्यरत होणे तर लांबच पण त्याची गांभीर्याने दखल घेण्याचे सौजन्यही देशोदेशींच्या नेतृत्वाकडून अद्याप दाखविले गेले नाहीच! श्रीमंत राष्ट्रांनी या संकटाचा सामना करण्यात स्वत:हून पुढाकार घेतल्याचे ऐकिवात येत नाही आणि त्यांनी तसा पुढाकार घ्यावा, या आग्रहासाठी विकसनशील देश व गरीब राष्ट्रे एकत्रित आल्याचेही पहायला मिळत नाहीच! उलट कोरोना संकटाच्या आडून आपले राजकीय हिताचे अजेंडे रेटण्याचाच जीवतोड प्रयत्न होताना दिसतो आहे. मग या शतकातल्या महाभीषण व कैकपदरी संकटात गरीब जनतेचा वाली कोण? हाच प्रश्न! या प्रश्नाचे सध्याचे उत्तर ‘परमेश्वर’ हेच! अशीच सगळी स्थिती आहे. भारतापुरते बोलायचे तर आपली परिस्थिती तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशीच! आकलनशून्यतेतून ठाणबंदी हाच कोरोनावरचा उपचार मानत सरकारने देश दीर्घकाळ घरातच कोंडून ठेवण्याचे महनीय काम पूर्ण निष्ठेने आणि ‘न भूतो न भविष्यति’ एवढ्या तत्परतेने, प्रामाणिकपणे पार पाडले! त्यासाठी वेळोवेळी स्वत:ची पाठही थोपटून घेतली! आज त्याने काय साधले? हे देशातील शेंबड्या पोरालाही पुरते कळून चुकलेय! तरीही पाठ थोपटून घेण्याचा व आपला निर्णय योग्यच ठरवण्याचा राजकीय निगरगट्टपणा सुरूच आहे.

हिमालयात मोठा भूकंप होणार; दिल्लीसह उत्तरेकडील शहरे हादरणार

तो असण्यालाही सर्वसामान्य जनतेचा आक्षेप राहणार नाही पण ज्या निर्णयाचे श्रेय तुम्ही घेताय त्याच्या ‘साईड इफेक्टस्’ची जबाबदारी तरी सरकारने स्वीकारावी! सरकारकडून या प्रामाणिकपणाची जनतेला अपेक्षा आहे व ती गरज आहे. कारण प्रामाणिकपणे निर्णयाची जबाबदारी स्वीकारली तरच निर्माण झालेल्या संकटावर मार्ग शोधण्याचे व काढण्याचे प्रयत्न सुरू होऊ शकतात! मात्र, या सरकारचा अशा प्रामाणिकपणाशी दुरान्वयेही संबंध नाही, असेच निदर्शनास येते! तसे देशातला सध्याचा राजकारणाचा एकंदर पोत पाहता ‘प्रामाणिकपणा कशाशी खातात रे भाऊ?’ असाच प्रश्न पडावा, अशीच स्थिती! त्याबाबतची चिंता वेगळीच! मात्र, कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात तरी वर्षानुवर्षे गरीब व गरिबांचे कल्याण याचा घसा कोरडा पडेपर्यंत अखंड जप करणा-या सर्वच राजकीय पक्षांनी खरोखरच गरीब जगवण्याची, जिवंत ठेवण्याची ही नामी संधी साधून ‘पावन’ का होऊ नये? हा खरा प्रश्न! असो!! या प्रश्नाचे जनतेला वारंवारच्या सर्वव्यापी व सर्वांगाने मिळणा-या अनुभवांनी उत्तर मिळालेलेच आहे आणि ते जनतेच्या अंगवळणीही पडले आहे.

त्यामुळे ‘मुकी बिचारी जनता’ कुठल्या ‘तारणहार’ किंवा ‘रॉबिनहूड’ची प्रतीक्षा न करता व अपेक्षाही न बाळगता आपापल्या जगण्याची लढाई नेटाने लढतेच आहे. मात्र, त्यावरही सरकार समाधान मानत नाही तर उलट स्वत:चे नाकर्तेपण दाखवून देणारी आकडेवारीच निकष बदलून व शब्दांचे खेळ रंगवून लपवण्याचा प्रयत्न करते! सरकारच्या या कोडगेपणाला आता काय संबोधावे? हाच प्रश्न! कोरोना संकटात जिवंत राहण्याची व जगणे वाचविण्याची लढाई प्राणपणाने लढणा-या गरिबांना दिलासा, मदत आणि बळ देणे तर दूरच उलट या गरिबांना गरीब संबोधण्याचे निकषच बदलून, शाब्दिक खेळ करून त्याद्वारे हे संकटच झाकण्याचा अश्लाघ्य प्रकार करत गरिबांच्या दु:खावर मीठ चोळण्याचाच प्रयत्न सरकारने चालविला आहे. काय तर म्हणे देशातील दारिद्र्यरेषा ठरवण्याची पद्धत व निकष सदोष आहे. त्यामुळे निकष बदलून नव्याने दारिद्र्यरेषेची व्याख्या करायला हवी! व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न हा गरिबीचा एकमेव निकष असत नाही तर त्याचे राहणीमान, शिक्षण, पाण्याची असणारी त्या परिसरातील उपलब्धता, त्या परिसरातील स्वच्छता, आरोग्य सेवांची उपलब्धता व दर्जा, व्यक्ती कोणत्या परिस्थितीत राहतो ती परिस्थिती वगैरे सगळ्या बाबी तपासून गरीब व श्रीमंत ठरवला जाईल.

हिमालयात मोठा भूकंप होणार; दिल्लीसह उत्तरेकडील शहरे हादरणार

त्यावरून गरिबीचे निकष ठरतील व गरिबीची व्याख्याही ठरेल! म्हणजे उदाहरणच द्यायचे तर संपन्न मुंबईच्या, स्वच्छ उड्डाणपुलाखाली कसेबसे जगणारा व पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करणारा मजूर हा त्याला रोजची किती मजुरी मिळते यावरून गरीब मानला जाऊ शकत नाही कारण तो सर्वार्थाने संपन्न मुंबईत राहतो. तेथे मुबलक पाणी आहे, मोठमोठी रुग्णालये आहेत, चकाचक रस्ते आहेत, शिक्षणाच्या प्रचंड सुविधा उपलब्ध आहेत, सर्व वस्तू, कपड्यांची मोठमोठी दुकाने आहेत., उत्तम हॉटेल्स आहेत. रेल्वे, बस, विमान, लोकल, टॅक्सी या सगळ्या सुविधा हात जोडून उभ्या आहेत. मग अशा संपन्न शहरात जगणारा, मग तो फुटपाथवर राहो की, उड्डाणपुलाखाली की, झोपडपट्टीत, गरीब कसा? असेच सरकारला विचारायचे आहे. अशी लाखो उदाहरणे येथे देता येतील. मात्र, सर्वांचे सार एकच, ते म्हणजे, देश आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असताना तुम्ही उगाच गरिबीचे रडगाणे कसे गाता?

सरकार हा ढोंगीपणा व देशाची अकारण बदनामी मान्य करणार नाहीच! सबब तुम्हाला किती पैसे मिळतात, तुम्हाला रोज कितीदा जेवायला मिळते, हे सगळे गौण! सत्य हेच की, देश गरीब नाही म्हणून देशात कुणीही गरीब असूच शकत नाही! हाच निष्कर्ष सरकार काढू पाहतेय! देशातील गरिबी हटवण्याचा सरकारचा हा रामबाण उपाय, हाच काय तो या निर्णयाचा अन्वयार्थ! मग त्याने वास्तव बदलेल का? वगैरे सगळे प्रश्न फालतू आणि गौणच! गरिबीची व्याख्या व निकषच बदलले की, ‘ना रहेगा गरीब, ना रहेगी गरिबी’!! त्यामुळे जनतेने आता स्वत:ला श्रीमंत, संपन्न व सुखी समजण्यास सुरुवात करावी, हाच उत्तम पर्याय, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...