27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home संपादकीय संरक्षणात आत्मनिर्भरता!

संरक्षणात आत्मनिर्भरता!

एकमत ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अत्यंत आवडता पण सध्याच्या जागतिक परिस्थितीत स्वप्नवतच ठरण्याची शक्यता सर्वांत जास्त असलेला स्वदेशी चा मंत्र नव्या परिभाषेत व शब्दांत मांडताना मेक इन इंडिया चा अत्यंत आकर्षक नारा दिला होता़ केवळ नारा देऊन मोदी सरकार थांबले नाही तर त्यांनी या घोषणेचे अगदी नेत्रदीपक मार्केटिंग ही केले होते़ त्यातून भारतीयांच्या बुद्धिमत्ता, गुणवत्ता, कार्यकौशल्यता व कल्पकतेला प्रचंड मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे, होतकरू भारतीयांना भरभक्कम आर्थिक बळ व प्रोत्साहन मिळणार असल्याचे एक अत्यंत मनभावन चित्र रेखाटण्यात आले होते़ तसेच देशात रोजगाराची गंगा खळखळून वाहणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला होता.

नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये त्याचे प्रत्यक्षात काय झाले, याचा अनुभव देशाने घेतलेलाच आहे आणि त्याबाबतची आकडेवारी आणि त्यातील गौडबंगालही देशासमोर आलेलेच आहे़ त्यामुळे त्यावर पुन्हा भाष्य करण्याची गरज नाही़ मात्र, या घटनाक्रमाचे नव्याने स्मरण करणे आज पुन्हा गरजेचे बनले आहे कारण मोदी सरकारच्या दुस-या टर्ममध्ये देशावर कोरोनाचे न भूतो न भविष्यति असे संकट कोसळले आहे आणि त्याने केवळ आरोग्याचाच नव्हे तर अर्थकारणाचाही कल्लोळ देशात निर्माण केलाय़ या अर्थकल्लोळाला सामोरे जाताना मोदींनी पुन्हा एकवार नवी शब्दरचना करत आत्मनिर्भर भारत चा नारा दिला आहे़ एवढेच नाही तर कोरोनाच्या संकटात संधी शोधण्याचा व निर्माण करण्याचा भारताचा प्र्रयत्न राहील, असा संदेश पुन्हा एकवार दिला आहे़ तसे बघितले तर मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत च्या घोषणेला आणि इराद्यालाही कुठल्याच भारतीयाचा आक्षेप किंवा विरोध असण्याचे काहीच कारण नाही़ देश आत्मनिर्भर होणे कोणाला आवडणार नाही? मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का? उतरवले जाणार का?

यावर पूर्वानुभवाने शंका नक्कीच निर्माण होतात़ त्यातही मोदी सरकार आपल्या आत्मनिर्भर भारत च्या घोषणेची अंमलबजावणी थेट संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरून सुरुवात करत असेल तर मग त्यावर सांगोपांग चिकित्सा व चर्चा आवश्यकच ठरते़ अशा चिकित्सेला नकारात्मकता हे लेबल लावून ती उडवून लावणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे देशहिताला परवडणारे नाहीच! मात्र, संरक्षण साहित्य खरेदी हा आपल्या देशात सातत्याने मोठ्या व आवडीच्या राजकारणाचाच विषय ठरतो़ त्यामुळे या अत्यंत कळीच्या मुद्यावर नि:पक्ष चिकित्सा विरळच ठरते आणि उदंड राजकारणच रंगते़ बोफोर्सपासून राफेलपर्यंतचा देशाचा इतिहास तपासला तर याची प्रचीतीच यावी़ त्यामुळे यावेळीही त्यावर राजकारण रंगणार नाही, याची खात्री देणे धाडसाचेच! मात्र, हा मुद्दा देशासाठी कळीचा असल्याने नागरिकांनी तो राजकीय अंगाने तपासण्यापेक्षा वास्तव परिस्थिती समजून घेणे जास्त आवश्यक आणि हिताचेही! असो!!

सोशल मीडियावरील (अ) सुरक्षा!

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारचा धमाका म्हणून १०१ शस्त्रास्त्र व लष्करी उपकरणांच्या आयातीवर २०२५ पर्यंत बंदी घालून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत चा बिगूल फुंकला आहे़ टप्प्याटप्प्याने लागू होणा-या आयातबंदीच्या सामग्रीच्या या यादीत तोफा, लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, लढाऊ हेलिकॉप्टर, सैन्य वाहतुकीची विमाने, जेट इंजिने, आर्टिलरी गन, रायफल, बॅलेस्टिक हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट आदी १०१ बाबींचा समावेश आहे़ ही घोषणा करताना संरक्षणमंत्री भारतीय संरक्षण उद्योगांसाठी या निर्णयामुळे नव्या व मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी पुस्ती जोडायलाही अजिबात विसरलेले नाहीतच! या सरकारच्या घोषणेचे स्वागतच! त्याला आक्षेप असण्याचे कारणही नाही़ मात्र, प्रत्यक्षात याबाबतची स्थिती तपासली तर सत्य आणि स्वप्न याच्यात जमीन-आस्मानची तफावत आढळून येते़ सत्य काय?

तर गेल्यावर्षी आपली संरक्षणावरील एकूण आर्थिक तरतूद ही ६० अब्ज अमेरिकी डॉलर होती आणि यावर्षी त्यात आणखी १० अब्ज डॉलरची भर घालण्यात आली आहे़ यातला सर्वांत मोठा वाटा हा शस्त्रास्त्र आयातीवर खर्च होतो आणि जगात शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीत आपला देश सौदी अरेबियानंतरचा दुस-या क्रमांकाचा देश आहे़ २०१४ ला देशाची सूत्रे स्वीकारून मोदींनी मेक इन इंडिया चा नारा दिल्यानंतरही आजवर शस्त्रास्त्रे व संरक्षण सामुग्रीच्या आयातीत घट होण्याऐवजी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे़ अशा स्थितीत आता संरक्षण क्षेत्रात देण्यात आलेला हा आत्मनिर्भरतेचा दावा वास्तवात किती फलद्रुप होणार? व केला जाणार? ही शंका निर्माण होतेच! मात्र, जर सरकारने खरोखरच आपल्या घोषणेला कसोशीने मूर्त रूप दिले तर देशांतर्गत उद्योजकांना पुढील पाच ते सात वर्षांत चार लाख कोटींपर्यंतची कंत्राटे मिळू शकतात, हे ही वास्तव! अर्थात याने संरक्षण आत्मनिर्भरतेत जादुई परिवर्तन वगैरे होण्याचे चित्र स्वप्नवत!

मात्र, अशा परिवर्तनाच्या दिशेने टाकले जाणारे हे पहिले पाऊल नक्कीच ठरू शकते, हे ही मान्य केलेच पाहिजे! त्यामुळे एका अंगाने पी़ चिदंबरम् यांनी या घोषणेवर दिलेली शब्दच्छल ही प्रतिक्रिया जशी योग्यच तसेच दुस-या अंगाने हा शब्दच्छल न ठरता तो वास्तव बदल ठरू शकतो जर सरकारने तशी तीव्र इच्छाशक्ती दाखविली तर हे ही खरेच! नेमका हा जर-तर च शंकेची निर्मिती करणारा ठरतो कारण अत्यंत आकर्षक व भव्यदिव्य घोषणा मात्र, अंमलबजावणी शून्य, हीच या सरकारची आजवरची कार्यपद्धती असल्याचा पूर्वानुभव आहे! ही शंका दूर करायची तर सरकारला बोले तैसा चाले ही उक्ती आपल्याच तीव्र इच्छाशक्तीतून आणि कठोर प्रयत्नांतून वास्तवात उतरवावी लागेल़ मोदी सरकार ही तीव्र इच्छाशक्ती दाखविणार का? हा खरा प्रश्न आणि त्याच्या उत्तरावरच या घोषणेचे यश-अपयश अवलंबून राहणार आहे, हेच सत्य! आता दुसरी महत्त्वाची शंका म्हणजे या घोषणेची अंमलबजावणी देशाला खरोखरच शक्य आहे का? या शंकेला दोन बाजू आहेत़ एक म्हणजे भारताची तांत्रिक क्षमता आणि दुसरी जागतिक स्थिती!

सोशल मीडियावरील (अ) सुरक्षा!

या बाजूंवर विचार केला तर भारत अशा बाबतीत नक्कीच तांत्रिक क्षमता बाळगून आहेच मात्र अद्याप ती जगात सर्वोत्कृष्ट नाही, हे वास्तव़ त्यामुळे आपण सुटे भाग व काही प्रमाणात स्वदेशी बनावटीची शस्त्रनिर्मिती सुरू करण्याचे पाऊल उचलून आत्मनिर्भरतेच्या प्रवासास सुरू करू शकतो पण आज इतर देश याबाबतीत ज्या मुक्कामावर आहेत तो लांबचा पल्ला आहे आणि हा पल्ला पार करण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ सातत्यपूर्ण कठोर मेहनत करावी लागेल! शिवाय हे अंतर पार करण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्याचे योग्य नियोजन म्हणून आत्मनिर्भरतेचे प्रयत्न आणि संरक्षणसज्जतेसाठीचे काळानुरूप खरेदी करार, यात सुयोग्य समन्वय राखण्याची तारेवरची कसरत यशस्वी करावी लागेल़ जगाच्या लेखी व मित्रराष्ट्रांसाठीही आपली आत्मनिर्भरते ची घोषणा त्यांच्या हेतूंना अडसर ठरणारे अनाठायी धाडस ठरणार नाही आणि त्याच्या परिणामी आपलीच कोंडी होणार नाही, याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

असंवेदनशीलतेचा कळस!

केंद्रातले मोदी सरकार २०१४ ला सत्तेवर आल्यापासून आपण देशातील गरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी आदी समाजघटकांचे कसे तारणहार आहोत, अगोदर सत्तेवर असलेल्या सरकारपेक्षा किती संवेदनशील...

कांदा पुन्हा रडवणार…!

जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा हे मराठी माणसाचे, शेतक-यांचे प्रमुख खाद्य आहे. श्रमिक मंडळींच्या जेवणातील तो प्रमुख घटक आहे. कांदा हे गरिबांचे मुख्य अन्न आहे...

‘सावधान’ भारत!

ऐन कोरोना संकटाच्या काळात लडाख भागात ‘लाल सेने’ने सुरू केलेल्या कुरापती पाच महिने उलटले तरी थांबत तर नाहीतच पण वरचेवर या कुरापतींची व्याप्ती वाढविण्याबाबत...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरांत पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे...

बाधितांची संख्या वाढता वाढे…!

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४७ लाखांचा आकडा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वच राज्यांत रुग्णवाढीचा दर साधारण होता परंतु या महिन्यात त्याने उचल खाल्ली आहे....

हद कर दी आपने!

सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडमधल्या कलाकाराने ऐन कोरोना काळात आत्महत्या केल्याने खळबळ उडणे ही साहजिक बाब होती. या गुणी कलाकाराच्या मृत्यूवर त्याचे चाहते व बॉलिवूडमधील...

संयमाची परीक्षा!

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देऊन हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिल्यानंतर त्यावर राज्यातील मराठा समाजात निराशेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि ते...

चिंताग्रस्त क्रीडाजगत्

कोणताही खेळ म्हटला की त्यात खेळाडूने खिलाडूवृत्ती दाखवलीच पाहिजे, स्पर्धेच्या नियमावलीचे पालन केलेच पाहिजे. खेळामुळे जग जवळ आले, जागतिक सलोखा वाढला. क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक...

गुणवत्तेला न्याय!

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेतील ७०:३०ची कोटा पद्धत अखेर रद्द झाली. मराठवाडा व विदर्भातील पालक व विद्यार्थ्यांच्या प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले....

भयाचा बागुलबुवा

भयनिर्मितीमागे स्वत:च्या तुंबड्या भरणे, आपले इप्सित साध्य करणे हाच मुख्य उद्देश असतो. हे सारे करण्यामागे तल्लख डोके असते. हे सुपिक डोके कोणाचे ते लवकर...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...