26.9 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home संपादकीय बाधितांची संख्या वाढता वाढे...!

बाधितांची संख्या वाढता वाढे…!

एकमत ऑनलाईन

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४७ लाखांचा आकडा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वच राज्यांत रुग्णवाढीचा दर साधारण होता परंतु या महिन्यात त्याने उचल खाल्ली आहे. गत २४ तासांत सुमारे ९७ हजार रुग्णांची भर पडली. ही रुग्णवाढ आतापर्यंतच्या दिवसांतील सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहेग़त २४ तासांत सुमारे ८१ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले तर सुमारे ९ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ३७ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत सुमारे ७८ हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

मृत्युदर १.६ टक्के आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. भारतात एकाच दिवसात ७० हजारहून अधिक कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारत आहे. देशात शनिवारी एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक गाठला गेला. शनिवारी एका दिवसात ८१ हजार ५३३ रुग्ण बरे झाले. बरे होणारे देशातील ६० टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यांतील आहेत. शनिवारी महाराष्ट्रात १४ हजारहून अधिक तर कर्नाटकात १२ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले. जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.

त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थिती संदर्भात एक अहवाल जारी केला असून, त्यानुसार कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारण्याचा वेग हा सर्वाधिक असून मे महिन्यात जवळपास ५० हजार रुग्ण बरे झाले तर सप्टेंबर महिन्यात हीच आकडेवारी ३६ लाखांहून अधिक आहे. लोकांच्या मनात कोरोनाबद्दलची भीती कमी झाली तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होऊ शकते. कोरोनाची साथ ही अन्य साथींप्रमाणेच एक आहे हे जनतेने समजून घेतले पाहिजे. कोरोना साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांचा पहिला एक लाखाचा टप्पा ६४ दिवसांनी गाठला गेला होता. आता जवळपास तेवढी रुग्णसंख्या २४ तासांमध्ये पार केली जात आहे. देशातील २३३ जिल्हे कोरोनामुक्त मानले जात होते.

लोह व प्रथिनेयुक्त ‘फालसा’

या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. मात्र सीरो सर्वेक्षणात या जिल्ह्यांमध्ये सुमारे साडेआठ लाख लोक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच सर्वेक्षणाने ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नसल्याचे म्हटले होते. याचाच अर्थ असा की कोणतेही सर्वेक्षण तंतोतंत खरे ठरत नाही. म्हणून जनतेने अशा सर्वेक्षणावर फारसा विश्वास ठेवू नये किंवा त्यांचा बागुलबुवा मनात बाळगू नये. निवडणुकीच्या कालावधीत अनेक सर्वेक्षणांचा महापूर येतो. परंतु प्रत्यक्षात निवडणूक निकालात काय घडते ते सा-यांनाच माहीत आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आतापर्यंत देशात सुमारे ३६ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना विषाणूवरची लस किंवा औषधीसंबंधीच्या बातम्यांमुळे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ असे सांगत कोरोनाबाबत निष्काळजी करू नका असे आवाहन केले आहे. कोरोनाविरोधात दो गज की दूरी आणि मास्क अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाचे अर्थकारण पूर्णत: बिघडल्याची कबुलीही त्यांनी दिली. कोरोना प्रकोप अजूनही थांबलेला नाही तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा एकमेव उत्तम पर्याय जनतेपुढे आहे. कोरोनावर लस अथवा औषध येईल तेव्हा येईल पण लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे.

आपल्या परिसरात कोरोनाबाधित असो वा नसो, आपल्याला कोरोनाची लक्षणे असतील वा नसतील तरीही प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरायलाच हवा. आज अनेक लोक मास्क न लावता फिरताना दिसतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा सामना करण्यासाठी काय करावे- काय करू नये यासंबंधीची सविस्तर माहिती पुन्हा एकदा दिली आहे. रोज सकाळ, संध्याकाळ अर्धा तास घरच्या घरी का होईना वॉक करा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, आयुर्वेदिक गोष्टींचे नियमित सेवन, सकाळ-संध्याकाळ हळद घातलेले दूध, हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, १ चमचा च्यवनप्राश नियमित घ्या असे या माहितीत म्हटले आहे.

आडव्या झालेल्या ऊसाची अशी काळजी घ्या

कोरोना काळात बदनाम झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (डब्ल्यूएचओ) आहारावर नियंत्रण ठेवा असे म्हटले आहे. पॅकेटबंद, डबाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. घरात तयार केलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करा, तेलकट, तुपकट पदार्थ कमी खा., आहारात फळे, भाज्यांचा समावेश करा, चहा-कॉफीचे प्रमाण कमी करा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही या विषाणूवर लस सापडली नसल्याने लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याशिवाय वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार असून कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेद्वारे लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकणे व त्यासाठी काही नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

असंवेदनशीलतेचा कळस!

केंद्रातले मोदी सरकार २०१४ ला सत्तेवर आल्यापासून आपण देशातील गरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी आदी समाजघटकांचे कसे तारणहार आहोत, अगोदर सत्तेवर असलेल्या सरकारपेक्षा किती संवेदनशील...

कांदा पुन्हा रडवणार…!

जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा हे मराठी माणसाचे, शेतक-यांचे प्रमुख खाद्य आहे. श्रमिक मंडळींच्या जेवणातील तो प्रमुख घटक आहे. कांदा हे गरिबांचे मुख्य अन्न आहे...

‘सावधान’ भारत!

ऐन कोरोना संकटाच्या काळात लडाख भागात ‘लाल सेने’ने सुरू केलेल्या कुरापती पाच महिने उलटले तरी थांबत तर नाहीतच पण वरचेवर या कुरापतींची व्याप्ती वाढविण्याबाबत...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरांत पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे...

हद कर दी आपने!

सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडमधल्या कलाकाराने ऐन कोरोना काळात आत्महत्या केल्याने खळबळ उडणे ही साहजिक बाब होती. या गुणी कलाकाराच्या मृत्यूवर त्याचे चाहते व बॉलिवूडमधील...

संयमाची परीक्षा!

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देऊन हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिल्यानंतर त्यावर राज्यातील मराठा समाजात निराशेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि ते...

चिंताग्रस्त क्रीडाजगत्

कोणताही खेळ म्हटला की त्यात खेळाडूने खिलाडूवृत्ती दाखवलीच पाहिजे, स्पर्धेच्या नियमावलीचे पालन केलेच पाहिजे. खेळामुळे जग जवळ आले, जागतिक सलोखा वाढला. क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक...

गुणवत्तेला न्याय!

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेतील ७०:३०ची कोटा पद्धत अखेर रद्द झाली. मराठवाडा व विदर्भातील पालक व विद्यार्थ्यांच्या प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले....

भयाचा बागुलबुवा

भयनिर्मितीमागे स्वत:च्या तुंबड्या भरणे, आपले इप्सित साध्य करणे हाच मुख्य उद्देश असतो. हे सारे करण्यामागे तल्लख डोके असते. हे सुपिक डोके कोणाचे ते लवकर...

आसूड की सूड?

आपल्या देशातील नोकरशाहीबाबत सर्वसामान्य जनतेचे मत फारसे बरे नाहीच. अर्थात त्यात नोकरशाही सर्वसामान्यांना जी वागणूक देते त्याचा खूप मोठा वाटा आहेच पण त्यासोबतच नोकरशाहीला...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...