24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeसंपादकीय...उम्मीद पे दुनिया कायम है!

…उम्मीद पे दुनिया कायम है!

एकमत ऑनलाईन

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते पूर्ण सत्य नाही. मराठवाड्यात तरी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते कोरोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्याची शपथ घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मास्क आणि सामाजिक अंतर यासंदर्भात अगदी ग्रामीण भागातसुद्धा बेजबाबदारपणा वाढला आहे हे खरे आहे. लोक विनामास्क सर्रास फिरताना दिसतात.

मास्क, अंतर व हाताची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु त्याचे महत्त्व लोकांच्या लक्षातच येत नाही. राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या सुमारे १६ लाख आहे, पैकी सुमारे साडेतेरा लाख रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत. सध्या राज्यात सुमारे २ लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर सुमारे ४२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केले आहे. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखता येऊ शकतो. या नवीन तंत्रामुळे कोरोनाचा प्रसार करणारे खास ब्लॉक तयार करता येणार आहेत. हे होईल तेव्हा होईल परंतु सध्या तरी देशावरील कोरोना संकट कायम आहे. अजूनही देशात हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन ती ४० हजारांवर येईल असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात अनेक बड्या शास्त्रज्ञांच्या संशोधनावर आधारित ही माहिती आहे. कोरोनाच्या वाढीवर आळा घालण्यासाठी आमचे प्रयत्न जारी आहेत.

लसीकरण प्रक्रियेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे असे हर्षवर्धन म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने कोरोना प्रकरणांचे मूल्यांकन मॉडेल तयार केले आहे, त्याआधारे आगामी ३-४ महिन्यांत देशातील कोरोनाची प्रकरणे कमी होतील असा आशावाद व्यक्त केला. लसीकरण, कर्मचा-यांचे प्रशिक्षण आणि इतर गोष्टींची वेळ येईल तेव्हा राज्य सरकारांशी चर्चा केली जाईल असेही हर्षवर्धन म्हणाले. या निमित्ताने का होईना केंद्र सरकारला राज्यांशी चर्चा कराविशी वाटतेय ही सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल! कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी भारताचे संशोधन आणि उत्पादन महत्त्वपूर्ण आहे. विशेषत: मोठ्या प्रमाणावर लस तयार करण्यासाठी भारताची मदत महत्त्वाची आहे असे बिल गेटस् यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा गत तीन आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे तर अनेक राज्यांत संसर्गाचे प्रमाण स्थिर आहे.

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

पण नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी हिवाळ्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले आहे. देशातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत असलेल्या तज्ज्ञांचे पॉल हे प्रमुख आहेत. हिवाळा सुरू होताच युरोपातील काही देशांत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतातही कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाहीफ़्रान्समध्ये काही शहरांत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी राजधानी पॅरिस आणि अन्य प्रमुख नऊ शहरांसाठी लागू आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अगदी वेगळी असेल असा अंदाज आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणू जगभरात पसरला. आता प्रत्येक देश या विषाणूचा सामना करीत आहे. न्यूझिलंड हा असा पहिला देश होता ज्याने पूर्णपणे कोरोनावर मात केली होती. त्यामुळे संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती.परंतु सुमारे शंभर दिवसांनंतर तेथे पुन्हा कोरोना संक्रमित रुग्ण आढळले.

त्यानंतर पुन्हा न्यूझिलंडमध्ये निर्बंध घालण्यात आले. आता पुन्हा एकवार या देशाने दुस-यांदा कोरोनामुक्ती मिळवली आहे. आता तेथील निर्बंध उठवण्यात आले आहेत. बार आणि रेस्टॉरंटमधील शंभरहून अधिक लोकांना एकत्र येण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी लोकांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हे शक्य झाले असे म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेनंतर देशाने जी सिस्टीम बनवली होती त्यामुळे या विषाणूविरुद्ध चांगले काम करता आले. न्यूझिलंडने ज्या मॉडेलचे अनुकरण केले त्याचाच अवलंब तैवाननेही केला. हाँगकाँग आणि व्हिएतनामनेसुद्धा तीच पद्धती वापरली. त्यामुळे त्यांना दुस-या किंवा तिस-या लाटेवर विजय मिळवता आला. भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि कोव्हिड-१९ लसीचे वितरण याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आढावा घेतला. लसीच्या जलद पुरवठ्याच्या पूर्वतयारीकडे विशेष लक्ष दिले.

देशाची लोकसंख्या पाहता लस तयार झाल्यानंतर लसीचे लवकरात लवकर वितरण होणे महत्त्वाचे आहे. लसीसाठी लागणारी सर्व साधने आणि वितरण त्वरित व्हावे यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील तीन लसी विकासाच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी दोन लसी दुस-या टप्प्यात तर एक लस तिस-या टप्प्यात आहे. लस आल्यानंतर या लसीसाठी लागणारी कोल्ड स्टोरेज, लसीचे वितरण, लस वितरणाची पाहणी, लसीसाठी आवश्यक असणा-या उपकरणांची तयारी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला निवडणुकांचे आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव आहे. हा अनुभव लस वितरणाच्या कामी वापरता येईल. मुळात लसींच्या तयारीबाबत आज कितीही दावे केले जात असले तरी अशा प्रकारच्या विषाणू प्रतिरोधक लसींची निर्मिती करणे हे प्रचंड क्लिष्ट आणि अवघड काम आहे. असे असले तरी अखेर… उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या