17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home संपादकीय दोन आनंदाच्या बातम्या...!

दोन आनंदाच्या बातम्या…!

एकमत ऑनलाईन

निसर्गाचा खेळ मोठा विचित्र आहे. माणसाला त्याचा ठाव लागता लागत नाही. निसर्ग माणसाला कधी हसवतो तर कधी रडवतो. पावसाळी हंगामात बहुतेक वेळा तो डोळे वटारतो तेव्हा माणूस कृपादृष्टीची याचना करीत असतो. त्याचे आगमन व्हावे म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसतो. मोठ्या मिनतवा-या केल्यानंतर तो बरसतो तेव्हा शेतक-याच्या चेह-यावर हसू फुलते. काही वेळा तो इतका बरसतो की अगदी नको.. नकोसे होऊन जाते. निसर्गराजा मोठा लहरी आहे. काही वेळा त्याला धरणीपुत्रांची फिरकी घेण्याची उबळ येते आणि तो येण्याचे आमिष दाखवून गायब होतो. त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. मग माणसाच्या मिनतवा-या सुरू होतात. हंगाम संपत आला तरी त्याची चाहूल लागत नाही. तेव्हा किमान परतीच्या प्रवासात तरी तो येईल या आशेवर माणूस जगत असतो. त्याचे परतणे ब-याच वेळा जीवनदायी असते तर काही वेळा दु:खदायी असते.

बरसला की असा काही बरसतो की शेतजमीनसुद्धा खरवडून नेतो. यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्रावर वक्रदृष्टीच केली. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपले. अनेकवेळा हवासा असणारा परतीचा पाऊस यंदा नकोसा झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी पाणी कपातीचे संकट टळले. दुष्काळाची स्थिती नाहीशी झाली. सणासुदीचे दिवस असल्याने पावसामुळे आपले नुकसान होणार अशी भीती अनेकांच्या मनात होती मात्र हवामान विभागाने त्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यात गत काही दिवसांपासून पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली आहे. ‘नको नको रे पावसा, तुला देतो पैसा’ असे म्हणायची वेळ येणार नाही असे दिसते. अजूनही काही भागात ढगाळ वातावरण असले तरी वरुणराजाने आपले चंबुगबाळ सावरण्याची तयारी केली आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांतून पाऊस माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आज पाऊस भारतातूनही परतण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने बहुतेक धरणे पूर्णपणे भरली आहेत मात्र मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात परतीचा पाऊस मुसळधार बरसला. शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले.सोलापूरमध्ये तर रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहून जाताना दिसल्या. अनेकांच्या शेतीचे, पिकांचे, फळबागांचे, घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतक-यांवर ओढवलेल्या या आस्मानी संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीतून शेतक-यांना सावरणे गरजेचे होते. अर्थात या सरकारी मदतीतून बळिराजा पूर्णपणे सावरला जाईल असे नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र, रायगड आणि पुण्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती पण त्यांचा अंदाज चुकला ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी मंत्रिगटाची नियुक्ती ! उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिगटाचे अध्यक्ष

मोसमी पाऊस दोन आठवड्यांहून अधिक काळ रेंगाळला होता. आता त्याचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. यंदा मोसमी पावसाने पाच महिन्यांहून अधिक काळ आपला मुक्काम ठोकला होता. शेवटच्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरी आनंदाची बाब म्हणजे देशात सहा महिन्यांपासून थैमान घालणा-या कोरोना विषाणूनेही परतीच्या पावसाचे अनुकरण केले आहे असे दिसते. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता दिवसागणिक देशातील कोरोनाबाधितांची संख्या तसेच नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. २७ ऑक्टोबर रोजी सुमारे ३६ हजार कोरोनाबाधितांचे निदान झाले तर ४८८ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. देशात सुमारे सव्वा लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे ही दिलासादायक गोष्ट. देशात कोरोनाबाधितांचा मृत्युदरही घटला आहे. तो १०.५ टक्क्यांवर आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट झाली. आता खासगी प्रयोगशाळेत होणा-या कोरोना चाचण्यांचे दर प्रति तपासणीमागे सुमारे दोनशे रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले. साडेचार हजार रुपयांवरून ९८० रुपयांपर्यंत दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले आहेत. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून दरनिश्चिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. सध्या प्रति १० लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात वाढ करण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाचा धुमाकूळ रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू होते. सर्वप्रथम रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. ‘स्पुटनिक-व्ही’ ही लस रशियामध्ये देण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करा, राज्‍य सरकारचे रेल्‍वेला पत्र !

ही लस तयार करणा-या कंपनीने असा दावा केला आहे की, पहिल्या डोसनंतर सुमारे ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस आता भारतातही येणार आहे. रशियाने दिलेल्या माहितीनुसार या लसीचे सुमारे १०० दशलक्ष डोस भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला देण्यात येणार आहेत. रशियात दुसरी लस नोंदविण्यात आली आहे तर तिस-या लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गत २४ तासांत तेथे ८०४ रुग्ण आढळून आले. ३७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत १४ लाख ७० हजार ६६० कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के आहे. एकंदरीत परतीचा पाऊस आणि कोरोना विषाणू परतीच्या मार्गावर आहेत ही अत्यंत आनंदाची बाब म्हणावी लागेल.

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

गोंधळाचीच घंटा!

मार्च महिन्यात देशात व राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना आरोग्य संकटाने बंद केलेली विद्यामंदिराची दारे आज (सोमवार)पासून महाराष्ट्रात उघडली जाणार आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा-महाविद्यालयांच्या...

अपेक्षाभंगाचा शॉक !

राज्यातील वाढीव वीजबिलाचा प्रश्न आता वेगळे वळण घेणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रश्नावरून सर्वसामान्य जनतेत अगोदरच प्रचंड रोष होता. तो वाढविण्याचाच प्रयत्न...

दुसरी लाट, तिसरी चाचणी

कोरोना विषाणू गायब झाला काय? असा प्रश्न केल्यास अनेकजण त्याचे उत्तर ‘हो’ असेच देतील. कारण सध्या लोकांचे वर्तन कोरोना हद्दपार झाल्याचेच सांगते. अनेकजण सर्रास...

तेलाविना पणती!

यंदाच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत साज-या झालेल्या दिवाळीत देशातील घराघरांत ज्या कोट्यवधी पणत्या पेटल्या त्यातून मागच्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जे संकटाचे मळभ निर्माण केले होते...

आक्रस्ताळेपणा आवरा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अर्णबला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अर्णबसह अन्य...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...