27.5 C
Latur
Friday, December 4, 2020
Home संपादकीय ...तू तर चाफेकळी!

…तू तर चाफेकळी!

एकमत ऑनलाईन

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून चरित्र नायिका म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणा-या, मराठी चित्रसृष्टीतील घरंदाज व्यक्तिमत्त्व ही प्रतिमा अखेरपर्यंत जपणा-या आणि भारदस्त अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीसह रंगभूमी गाजविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. सोनी मराठी वरील नवी मालिका ‘आई माझी काळुबाई’च्या सातारा येथील सेटवर चित्रीकरणासाठी त्या आल्या होत्या. या दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली. या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. आशालता वगळता सा-यांची प्रकृती सुधारली परंतु आशालता यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

आशालता यांच्या निधनामुळे मालिकेतील सेटवर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून केल्या जाणा-या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात दीर्घ पल्ला गाठलेल्या दिग्गज अभिनेत्रीचे असे दुर्दैवी निधन त्यांच्या सहका-यांना आणि चाहत्यांना चटका लावणारे ठरले आहे. कोरोनाने आणखी एका गुणी कलाकाराला रसिकांपासून हिरावून नेले आहे. नाटक, दूरदर्शन व चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवला होता. या तिन्ही प्रकारात यशस्वी होणा-या मोजक्या कलाकारात त्यांची गणना होते. त्यांच्या सारख्या गुणी कलाकाराचे कोरोनाने निधन झाल्याने रसिकांना धक्का बसला आहे. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत आशालता यांच्यासोबतच अलका कुबल, प्राजक्ता गायकवाड यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अलका कुबल या मालिकेच्या निर्मात्या आहेत.

मालिकेचे चित्रीकरण साता-यात वाई जवळच्या एका फार्म हाऊसवर सुरू आहे. अलिकडेच मालिकेतील एका गाण्याच्या शुटिंगसाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप इथे आला होता. या ग्रुपमुळेच कोरोना विषाणू पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आलेल्या संधीचा फायदा घेत सतत शिकत आणि बदलांशी जुळवून घेत पुढे जाण्याची त्यांची धडपड यामुळे एक मेहनती अभिनेत्री म्हणून त्या नावारुपाला आल्या. वयाची पंचाहत्तरी उलटून गेल्यावरही एखादी चांगली भूमिका आली तर काम करायला त्या उत्सुक असायच्या. आशालता या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी ताकदीने साकारली. प्रत्येक भूमिकेचा बारकाईने अभ्यास करून ती साकारायची अशी त्यांची पद्धत होती.

मराठा आरक्षणासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागेल

आजच्या तरुण कलाकारांनी त्याचे अनुकरण केल्यास त्यांनाही घवघवीत यश मिळू शकते. त्यांनी ओढूनताणून अभिनय कधीच केला नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. पडद्यावरील त्यांचा सुखद वावर नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी होता. संगीत नाटकातील कारकिर्द त्यांनी अक्षरश: गाजवली. ‘मत्स्यगंधा’ या संगीत नाटकात त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफेकळी’ आणि ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही दोन पदे अजरामर राहतील यात शंका नाही. मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आशाताईंनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म मुंबईचा असला तरी त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे कोकणी भाषेवर त्यांचे प्रेम होते. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी कोंकणी गाणी गायली आहेत. पं. अभिषेकींमुळेच ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ आणि संगीत नाटकांशी त्यांचे नाते जोडले गेले.

या संघटनेने सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात त्यांनी रेवतीची भूमिका अप्रतिम वठवली. त्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वात गोव्याची एक सुंदर झाक होती. अत्यंत सोज्वळ आणि लाघवी सौंदर्य लाभलेल्या आशालता यांनी एकापेक्षा एक श्रवणीय नाट्यगीते गाऊन लक्षावधी रसिकांना तृप्त केले. अनेक नाटके, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ‘संगीत शारदा’ नाटकातील शारदेची ‘संगीत मृच्छकटिक’मधील वसंतसेनेची भूमिका त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देऊन गेली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘छिन्न’, ‘महानंदा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘गारंबीचा बापू’ या नाटकातील त्यांच्या भूमिका कोण विसरेल? पु.ल. देशपांडे यांच्या ‘वा-यावरची वरात’ या प्रयोगात त्यांनी साकारलेली बेळगाव-कारवारकडची कडवेकर मामी आजही नाट्यप्रेमींच्या स्मरणात आहे.

आर्थिक घसरण आणि पर्यावरण

‘भाऊबंदकी’ नाटकातील आनंदीबाई यासारखी वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी उत्तमरित्या वठवली. ‘छिन्न’मध्ये स्मिता पाटील, सदाशिव अमरापूरकरसारख्या कसलेल्या कलावंतांसमोर आशालताताई तेवढ्याच ताकदीने उभ्या राहिल्या. बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या पहिल्या चित्रपटात त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी ‘शौकीन’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘वो सात दिन’, ‘अंकुश’, ‘नमकहलाल’, ‘यादों की कसम’, असे संवेदनशील व व्यावसायिक धाटणीचे सिनेमे केले.

शंभराहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रसृष्टीत ‘उंबरठा’, ‘सुत्रधार’, ‘नवरी मिळे नव-याला’, ‘वहिनीची माया’, ‘माहेरची साडी’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी विविधांगी अभिनय सादर केला. अमोल पालेकर, गिरीश कर्नाड सारख्या मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली. कोरोना महामारीत साठी उलटलेल्या कलाकारांनी घरीच रहावे असा सल्ला सरकारने दिला होता. आशालताताईंनी तो मानला असता तर….? आपल्या नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनयाने असंख्य रसिकांची मने जिंकणा-या आशालताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बँका नक्की कोणासाठी?

बड्या खासगी उद्योगांना आणि बिगर बँकिंग वित्तकंपन्यांना बँका सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या तज्ज्ञ समितीने केली आहे. त्यावर काही अर्थतज्ज्ञांनी...

अन्नदाता राजकीय शत्रू आहे का?

केंद्र सरकारने शेतक-यांच्या कल्याणार्थ म्हणून गाजावाजा करत आणलेल्या तीन कृषी कायद्यांचे सरकारकडून कितीही जोरदार समर्थन होत असले तरी शेतक-यांच्या मनात त्याबाबत मोठी साशंकता आहेच...

चोराच्या उलट्या बोंबा!

सध्या जगभरात एकच चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग. गत दहा महिन्यांपासून या विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

चाणक्य….संकटमोचक हरपला !

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास...

पुन्हा टाळेबंदी नकोच!

दिवाळी धूमधडाक्यात साजरी केल्यानंतर लगेचच देशात व राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंतेचे ढगही जमायला सुरुवात झाली आहे. खरे तर ही रुग्णसंख्या...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...