जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण आगीत आठ घरे जळून खाक

किश्तवाड : जम्मू आणि कश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एका दुर्गम गावात बुधवारी लागलेल्या भीषण आगीत किमान आठ घरे आणि काही गोठे जळून खाक झाले, अशी माहिती अधिका-यांनी दिली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अधिका-यांनी सांगितले की, वारवान परिसरातील मुंगली गावातील एका घराला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली आणि ती बघता बघता लगतच्या घरांमध्ये पसरली. स्थानिक लोकांनी आग रोखण्यासाठी बाधित घरांचे काही भाग जेसीबीने पाडून आग पसरण्यापासून रोखण्याचा (फायरब्रेक तयार करण्याचा) प्रयत्न केला, तरीही आगीने रौद्ररूप धारण केले. वारवान भागात अग्निशामक केंद्र नसल्यामुळे दक्षिण कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथून अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आणि पहाटे ४ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, असे अधिका-यांनी सांगितले. घटनास्थळावर काही ठिकाणी धूर निघत असल्याने बाधित भागावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

या आगीत काही जनावरे दगावली आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी सविस्तर पाहणी करणे शक्य न झाल्यामुळे नेमके किती पशुधनाचे नुकसान झाले हे लगेच समजू शकले नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अधिका-यांनी सांगितले. प्रशासनाने नुकसानीचा आणि मदतीच्या गरजेचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, जिल्हा मुख्यालयातून एक मदत वाहन पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.

वारवानसारख्या दुर्गम भागात हिवाळ्याच्या दिवसांत आगीच्या घटना तुलनेने नेहमीच घडतात; कारण येथील नागरिक जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर सुका चारा आणि गवत साठवून ठेवतात. घरांच्या आत किंवा घराला लागून सुके गवत साठवू नका, कारण आग लागल्यास यामुळे ती झपाट्याने पसरू शकते, असा सल्ला अधिका-यांनी स्थानिक लोकांना वारंवार दिला आहे. तसेच, सुका चारा साठवताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी तसेच धार्मिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना वारंवार करण्यात आले आहे असे अधिका-यांनी नमूद केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news