28.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रUpdate : एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना, १६ बंडखोर आमदार पात्र

Update : एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना, १६ बंडखोर आमदार पात्र

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांचा गटच ही मूळ शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील स्थिती ‘जैसे थे’ राहिली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन केले. या निकालात शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचें प्रतिज्ञापत्र ग्राहय धरण्यात आले नाही. तसेच राहुल नार्वेकर यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटना दुरुस्ती मान्य केली. उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे १९९९ मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळे त्यावेळची घटना वैध. पण २०१८ मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाहीत, असे राहुल नार्वेकर म्हणाले. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण नोंदवले.

ठाकरे शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. पक्षप्रमुखाचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाहीत. असे झाले तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीला घातक आहे. नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत.

ठाकरेंनी शिंदेंची केलेली हकालपट्टी मान्य करता येणार नाही. शिंदेंंना पक्षातून काढण्याचे अधिकार एकट्या ठाकरेंना नाहीत. उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय ग्रा धरता येणार नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR