पूर्णा : तालुक्यातील गौर येथील युवा नेतृत्व प्रल्हाद पारवे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारी पूर्णा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रेरणा वरपूडकर यांच्या हस्ते आ. सुरेश वरपुडकर यांच्या निवासस्थानी त्यांना निवडचे पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या पुढील कार्यास माजी खा. तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या असून जेष्ठ नेते हरिभाऊ शेळके, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, शंकरराव पुंडगे, हनुमंत डाके, रंगनाथ भोसले, मुरली कदम, सलीम साहब वहिद भाई खुरेशी, प्रा व्यंकटेश काळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे, शहराध्यक्ष शेख अहमद उपाध्यक्ष प्रशांत घाडगीळ, संभाजी मोरे, विश्वनाथ मोरे, विनायक यादव कुंदन ठाकुर यांच्यासह आदींनी पारवे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.