दुष्काळामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. सहकार विभागाने शासन आदेश देखील जारी केला आहे. राज्यातील ३०४ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. मदतकार्यावर परिणाम होऊ नये म्हणून निवडणुका थांबवल्याचा सरकारने दावा केला.

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि न्यायालयीन आदेश असलेल्या संस्था स्थगितीतून वगळल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ज्या संस्थांचा नामनिर्देशनाचा टप्पा २७ ऑक्टोबरपूर्वी सुरू झाला त्यांच्या निवडणुका सुरू राहणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. सहकार कायद्याच्या कलम ७३ क नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात न झालेल्या निवडणुका सध्याच्या टप्प्यावरूनच थांबणार आहे.

आदेशामधून सहकारी गृहनिर्माण संस्था, मा. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेल्या संस्था, तसेच ज्या संस्थांच्या निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याचा टप्पा २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वीच सुरू झालेला आहे अशा संस्थांच्या निवडणुकांना या स्थगितीतून वगळण्यात आले आहे. सध्या सुरू असलेली अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणुकीत फक्त मतदान बाकी असल्याने या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली नाही.

दुष्काळग्रस्त भागांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होतात. त्याचा थेट परिणाम दुष्काळ निवारण आणि मदतकार्यावर होण्याची शक्यता असते. त्यासोबतच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सभासद अडचणीत आलेले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच सरकारने या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलमांच्या तरतुदींनुसार शासनाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर केला आणि निवडणुकीला स्थगिती दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news