सोलापूर : बाळे उपकेंद्रात सर्किट ब्रेकरचे काम करताना विजेच्या धक्क्याने दत्तात्रय पाटील महापारेषणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.दत्तात्रय त्रिंबक पाटील (वय ४०, रा. बाळे, सोलापूर, मूळ रा. शिरवळ, ता. अक्कलकोट) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय हे महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते उपकेंद्रातील सर्किट ब्रेकरचे काम करीत होते.
तेव्हा विजेच्या धक्का बसल्याने ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील निवृत्त लाइनमन त्रिंबक पाटील, आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
विजेच्या धक्क्याने दहा दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने एका कंत्राटी महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महापारेषणच्या एका कायम कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याचे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.