मुंबई : मुंबईतील पवईमध्ये एका स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलीस ठेवणा-या रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. छातीत डाव्या बाजुला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचा मृतदेह सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आला.
गुरुवारी दुपारी १:४५ वाजता मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये युट्यूबर रोहित आर्यने २० हून अधिक मुलांना ओलीस ठेवले. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि विशेष कमांडोंनी बाथरूममधून प्रवेश केला आणि आरोपीला अटक केली होती. एका तासाच्या आत १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक नागरिकाला वाचवण्यात आले. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली. तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने १०० हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते.
रा स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आयोजित केले जातात, जिथे मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. घटनेदरम्यान, मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. त्यांचे पालकही आले आहेत. सुमारे १०० मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.
















