Homeनांदेडवाघी रोडवरील अतिक्रमण जमीनदोस्त; लाठींचा दिला प्रसाद

वाघी रोडवरील अतिक्रमण जमीनदोस्त; लाठींचा दिला प्रसाद

नांदेड : वाघी रोडवरील अतिक्रमण काढताना तेथील नागरिक व व्यावसायिकांनी ४ मे रोजी जेसीबी चालकावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून ५ मे रोजी त्याच ठिकाणी २ जेसीबी लावून अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी कारवाई लुडबुड करणा-या जमावाला सोैम्य लाठींचा प्रसाद देण्यात आला.

४ मे रोजी मिलगेट – वाघी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत असताना येथील जमावाने पोलिसांसमक्ष हल्ला करून जेसीबी चालकाला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात अनेक जणांवर गुन्हा नोंदविला गेला आहे. वाहतूक पोलीस यावेळी हल्लेखोरांना अटकाव करण्यासाठी गेला असता त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिका उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या पथकाने वाघी रस्त्यावरील अतिक्रमण २ जेसीबी लावून जमीनदोस्त केले. यावेळी कारवाईस विरोध करणा-या जमावास पोलिसांनी सौम्यरित्या लाठींचा प्रसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR