14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्र‘छोटे पक्ष संपवा..’ बातमी देणा-या पत्रकारांना नोटीस पाठवणार

‘छोटे पक्ष संपवा..’ बातमी देणा-या पत्रकारांना नोटीस पाठवणार

मुंबई : ‘छोटे पक्ष संपवा’ अशा आशयाचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी लावल्या होत्या. यावरून बावनकुळे यांच्यावर टीका केली जात होती. विरोधकांनी त्यांना धारेवर धरले होते. वाद वाढत असल्याचे पाहून बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आम्ही लहान पक्षांना घेऊन काम करतो. त्यांना सोबत घेतो. उलट शरद पवार लहान पक्षांना संपवतात. आम्ही लहान पक्षांचा सन्मान करतो. विरोधकांना काही कामे राहिलेली नाहीत. ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे, त्यांना मी नोटीस देणार आहे, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

मी असं म्हटलं की, विकसित भारताचा संकल्प मोदींनी केला आहे. या संकल्पाला साथ देण्यासाठी पक्ष प्रवेश होत आहेत. २७ तारखेलाही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. मी असं म्हणालो प्रत्येक बुथवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होत आहेत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले.

जे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यांना पक्षामध्ये घ्या. ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना पक्षात घ्या, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. नव्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या. जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करा. छोट्या पक्षांचा आम्ही कायम सन्मान केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR