23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeक्रीडाइंग्लंडचा नेपाळ विरुद्ध निसटता विजय

इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध निसटता विजय

मुंबई : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत इंग्लंड त्यांच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठ्या उलटफेरची शिकार होता होता राहिली. इंग्लंडने नवख्या असलेल्या नेपाळसमोर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. नेपाळने या धावांचा पाठलाग करताना सडेतोड बॅटिंग करत शेवटपर्यंत जोरदार लढा दिला. नेपाळच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता.

नेपाळला मोठा उलटफेर करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये १० धावांची गरज होती. नेपाळने शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र सॅम करन याने चिवट बॉलिंग केली. सॅमने ९ धावांचा यशस्वी बचाव केला. नेपाळला शेवटच्या बॉलवर ६ धावांची गरज होती. तेव्हा सॅमने हुशारीने बॉल टाकला आणि अवघी १ धाव दिली. इंग्लंडने अशाप्रकारे आपली लाज राखली आणि ४ धावांनी विजय मिळवला. तर नेपाळची झुंज अपयशी ठरली. मात्र नेपाळने या कामगिरीसह चाहत्यांची मनं जिंकली.

इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंग केली. इंग्लंडसाठी जेकब बेथल आणि कॅप्टन हॅरी ब्रूक या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. जेकबने ५५ आणि हॅरीने ५३ धावांची खेळी केली. जोस बटलर याने २६ धावांचे योगदान दिले. तर अखेरच्या क्षणी विल जॅक्स याने १८ बॉलमध्ये ३९ रन्सची खेळी करत फिनिशिंग टच दिला. इंग्लंडने अशाप्रकारे ७ विकेट्स गमावून १८४ धावा केल्या.

नेपाळसाठी दीपेंद्र सिंह आयरी आणि नमन यादव या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.
कुशल भुरटेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने १८५ धावांचा पाठलाग करताना नेपाळला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पावरप्लेचा फायदा घेत नेपाळला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र आसिफ नेपाळच्या ३७ धावा असताना आऊट झाला. आसिफने ९ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर कुशलही बाद झाला. कुशलने २९ धावांचे योगदान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR