23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाचे १० रुपये व्याजासह केले परत

अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाचे १० रुपये व्याजासह केले परत

एकमत ऑनलाईन

मुंबई : कौन बनेगा करोडपती १४च्या अलीकडील एपिसोडमध्ये प्राध्यापक धुलीचंद अग्रवाल हॉट सीटवर बसले आहेत. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकल्यानंतर त्यांनी स्टेजच्या तीन फे-या मारल्या. या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकास १० रुपये देत सोबत चित्रपट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान कौन बनेगा करोडपती १४ च्या एपिसोडमध्ये आलेले स्पर्धक धुलीचंद अग्रवाल यांनी संवादादरम्यान अमिताभ बच्चन यांना सांगितले की, त्यांना १० रुपये देणे बाकी आहे. मला ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपट पाहायचा होता. मी कसेतरी १० रुपये वाचवले आणि हे पैसे चित्रपट पाहण्यासाठी कसे पुरतील याचा हिशेब लावून बरेच मैल चालत गेलो. मी १० रुपये घेऊन तासन्तास रांगेत उभा राहिलो. जोपर्यंत माझा नंबर आला तोपर्यंत बॉक्स ऑफिसची खिडकी बंद झाली होती, असे धुलीचंद अग्रवाल यांनी सांगितले.

तिकिटांसाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने जमावात मोठी बाचाबाची झाली. मी जमिनीवर पडलो आणि डोक्याला मार लागला. त्यादिवशी शपथ घेतली की, अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पुन्हा कधीही पाहणार नाही.

तसेच प्रार्थना केली की एक दिवस बच्चन यांच्यासमोर बसून ही गोष्ट सांगू शकेन आणि कधीतरी त्यांच्यासोबत बसून हा चित्रपट पाहावा अशी इच्छा आहे. यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्राध्यापक धुलीचंद अग्रवाल यांना १० रुपयांची नोट दिली आणि सांगितले की ते त्यांचे पैसे व्याजासह परत करीत आहेत. बिग बींनी वचन दिले की ते त्यांच्यासोबत चित्रपट नक्कीच पाहतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या