24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनअली-रिचाचे वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल

अली-रिचाचे वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल

एकमत ऑनलाईन

मुंबई: अली फजल आणि रिचा चढ्ढा यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाचे वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कार्ड पूर्णपणे वेगळे आहे. या जोडप्याप्रमाणे लग्नपत्रिकाही वेगळी असेल, अशी कल्पना जवळपास सगळ्यांनाच होती. अशा स्थितीत लग्नपत्रिकेचा फोटोही समोर आला आहे. लग्नपत्रिकेत जुन्या काळातील रोमान्सची झलक स्पष्टपणे दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या लग्नाच्या कार्डची झलक पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की लग्नपत्रिका किती मनोरंजक आणि नावीन्यपूर्ण आहे. लग्नाची पत्रिका रेट्रो थीमवर आहे. रिचा आणि अलीच्या मित्राने त्यांच्यासाठी ही लग्नपत्रिका तयार केली आहे.

डिझायनरने रिचा आणि अलीच्या चेह-याचे पॉप आर्ट डिझाइनमध्ये रेखाटले आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या आमंत्रणावर माचिसच्या आकारात ९० च्या दशकातील रेट्रो फील आहे. त्यावर ‘कपल मॅचेस’ असे लिहिलेले आहे. या कार्डमध्ये रिचा आणि अली पारंपरिक कपड्यांमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत.

रिचा चढ्ढा आणि अली फजल ४ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कलाकार त्यांचा खास दिवस आणखी खास बनवण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रिचाच्या लग्नाचे दागिने बिकानेरमधील १७५ वर्षीय जुने ज्वेलर्स कुटुंब तयार करीत आहेत.

प्री-वेंिडग सेलिब्रेशन ३० सप्टेंबर रोजी दिल्ली जिमखाना येथून सुरू होईल. तेथे हा उत्सव ३ दिवस चालणार आहे. १ ऑक्टोबर रोजी मेहंदी आणि संगीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी रिचा आणि अली कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी लग्नाची पार्टी देणार आहेत. मात्र, लग्नपत्रिकेतील बहुतांश तपशील लपवण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या