27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनआकस्मिक मृत्यू की घातपात?

आकस्मिक मृत्यू की घातपात?

एकमत ऑनलाईन

सोनाली फोगट यांच्या चेह-यावर होती सूज आणि स्ट्रेच मार्क्स ;  पुतण्याच्या दाव्याने खळबळ
मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या निधनानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून असा दावा केला जात आहे की, सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होऊ शकत नाही. ही घटना एक कट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या दरम्यान सोनाली यांच्या पुतण्याने आणखी एक दावा केला आहे. त्याच्या मते, सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चेह-यावर सूज आणि एकीकडे स्ट्रेच मार्क्स होते.

सोनाली फोगट यांचा पुतण्या मोनिंदर फोगट याने एका न्यूज पोर्टलशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की, सोनाली यांनी कधीच ड्रगचे सेवन केले नव्हते. असे म्हटले जाते आहे की त्यांनी ड्रग्ज घेतले होते तर ते त्यांना त्यांच्या खाण्यात मिसळून कुणीतरी दिले असावे. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही कारण या वयातही त्या निरोगी होत्या.

मोनिंदरने केलेल्या दाव्यानुसार सोनाली यांच्या चेह-यावर सूज होती. एकीकडे त्यांच्या चेह-यावर स्ट्रेच मार्कही होते. त्यांच्या पुतण्यानेही या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली आहे. सोनाली यांच्या कुटुंबाने असा संशय व्यक्त केला आहे की हा त्यांच्याविरोधात कट रचण्यात आला आहे.

‘बिग बॉस १४’ मधून लोकप्रिय झालेल्या सोनाली यांचे निधन झाले. गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर सोनाली विशेष सक्रिय होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध सवाल उपस्थित केले जात आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, सोनाली फोगट यांचे गोव्यामध्येच शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतरच त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाईल. पोस्टमॉर्टेम करण्यासाठी डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली असून त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. व्हिसेरा रिपोर्टदेखील समोर आल्यानंतर ही घटना नेमकी कशी घडली असावी हे सांगता येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या