24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनआयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा हा सतत त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांतून आयुष्मानने स्वत:ला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे.

आता पुन्हा आयुष्मान ‘डॉक्टर जी’ असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहेरला आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही खुशखबर त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सुरुवातीला हा चित्रपट याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण नंतर याची तारीख बदलण्यात आली. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.

चित्रपटाच्या नावावरूनच हा एक विनोदी पद्धतीने समाजातील गोष्टींवर भाष्य करणारा चित्रपट असेल असा अंदाज लावता येऊ शकतो. आयुष्मान या चित्रपटात स्त्रीरोगतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शहा यासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूति कश्यप करणार आहे. अनुभूति ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची बहीण असून हा तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या