19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमनोरंजनआलिया ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये

आलिया ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये

एकमत ऑनलाईन

मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करुन लक्ष वेधून घेतले आहे. यासगळ्यात आलियाने आणखी एक गुÞड न्युज दिली आहे.आलिया ही आता हार्ट ऑफ स्टोन नावाच्या हॉलीवूडपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तो लूक पाहताच तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आलियाच्या हार्ट ऑफ स्टोनची चर्चा होती.

या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया हॉलीवूडपटामध्ये दिसणार आहे. गेल गेडॉट ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असून आलिया यात किया धवनची भूमिका साकारत आहे. नेटफ्लिक्सच्यावतीने ‘हार्ट ऑफ स्टोन’ची निर्मिती करÞण्यात आली आहे. सध्या ‘हार्ट ऑफ स्टोन’चे अ‍ॅक्शन सीन व्हायरलचा तो प्रोमो व्हायरल झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एका वाळवंटातून सुसाट वेगाने जाणा-या मोटारबाईकने त्या दृश्याची सुरुवात होते. त्यात गेल गेडॉट आणि रचेल स्टोन यांची अदा पाहायला मिळते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या