28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनऊर्मिला मातोंडकरचे मराठी सिनेसृष्टीत कमबॅक

ऊर्मिला मातोंडकरचे मराठी सिनेसृष्टीत कमबॅक

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘ती मी नव्हेच’ या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, ऊर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. ‘ती मी नव्हेच’ या सिनेमाने आता सिनेसरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या ‘ती मी नव्हेच’ या सिनेमात श्रेयस तळपदे, ऊर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत हे बॉलिवूड कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. आठवणींना उजाळा देत श्रेयस म्हणाला, एकेकाळी ‘रंगीला’मधील ‘या ही रे’ या गाण्यातील ऊर्मिलाच्या रूपाने सर्वांना घायाळ केले होते. त्याच ऊर्मिलासोबत कधी काळी स्क्रीन शेअर करायला मिळेल असे वाटले नव्हते.

परितोषने ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॉलेजचे विद्यार्थी आहोत. ऊर्मिलासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे. ‘ती मी नव्हेच’ हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा असल्याचेही श्रेयस म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या