मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कामापेक्षा जास्त आयराच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चा होताना दिसते. सध्या ती आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. अनेकदा ती बॉयफ्रेड नुपूरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे आयरा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आमिरची लेक आयरा खान मागच्या दोन वर्षांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हीडीओ शेअर करताना दिसतात. आता आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे आणि आजी जीनत हुसैन यांची भेट घालून दिली. या भेटीचे काही फोटो आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
आजी आणि नुपूरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना आयराने लिहिले, सहजच काढलेले आनंदी फोटो या फोटोंमध्ये आयरा, नुपूर आणि जीनत हुसैन हसून फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आयराच्या या फोटोंवर चाहत्यांनी धम्माल कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तर तिला ‘लग्न करणार आहेस का? असा प्रश्नदेखील कमेंटमध्ये विचारला आहे. जीनत आणि नुपूर यांच्या भेटीवरून आयरा लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.