22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजन‘काली’ चित्रपट निर्मात्याला समन्स

‘काली’ चित्रपट निर्मात्याला समन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई हिला आगामी काली माहितीपटाच्या पोस्टर्स आणि व्हिडिओमध्ये हिंदू देवतांचे कथितपणे चुकीचे चित्रण केल्याप्रकरणी मनाई आदेश मागणा-या याचिकेवर नवीन समन्स बजावले आहे.

न्यायालयाने यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी चित्रपट निर्माता लीना मणीमेकलाई हिला समन्स बजावले होते की, कोणताही आदेश देण्यापूर्वी सुनावणी झाली पाहिजे. मात्र, न्यायाधीश रजेवर असल्याने प्रकरण पुढे ढकलण्यात आले.

प्रतिवादी मणीमेकलाई आणि टुरिंग टॉकिज मीडिया वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हजर झाली नाही हे लक्षात घेऊन अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अभिषेक कुमार यांनी ईमेल आणि व्हॉटस्पसह सर्व मार्गांनी नवीन समन्स जारी करण्याचे निर्देश दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या